ताज्याघडामोडी

फेरीवाल्यांचे संसार सावरण्यासाठी सरकारची 61 कोटींची आर्थिक मदत

राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे फुटपाथवरील अधिकृत फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या फेरीवाल्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने 61 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये फेरीवाले व फुटपाथवरील विव्रेत्यांचाही समावेश आहे. या काळात त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी राज्यातील अधिकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना काळात अधिकाऱ्यांची ओली पार्टी; ग्रामस्थांकडून व्हिडीओ चित्रण

लातूर : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वछता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, […]

ताज्याघडामोडी

व्हॉट््सअ‍ॅपला रोखण्याची केंद्राची न्यायालयात मागणी

व्हॉट््सअ‍ॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण आणि सेवाशर्तींच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयास केली. नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपासून केली जाणार आहे. व्हॉट््सअ‍ॅप या समाज माध्यम व्यासपीठाच्या व्यक्तिगतता धोरणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही विनंती करण्यात आली आहे.