महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने https://cet. 11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सुविधा दि.2 ऑगस्ट अखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे. येत्या 21 ऑगस्ट […]
Tag: #exam
10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान – धनंजय मुंडे
मुंबई : 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री […]
दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार […]
डमी विद्यार्थ्यांनी दिली तलाठी पदासाठी परीक्षा; बनवाबनवी अशी झाली उघड
पुणे: गेल्या वर्षी जुलै महिन्यात महापोर्टलवरून घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या परिक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) […]
शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि […]
दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत ?
मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या […]
दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करावा या मागणीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक संघटना आग्रही
कोरोना आणि लॉककडाऊन मुळे या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे – जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर […]