ताज्याघडामोडी

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतचा कायदा रद्द केल्यापासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असून, छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये दिला आहे. या पत्राची दखल घेत खासदार संभाजीराजें छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. “छत्रपती […]

ताज्याघडामोडी

“मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,आमच्यामध्ये सामील व्हा,”; गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी

गडचिरोली : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष या प्रश्नावर बोलत असताना या आरक्षणाच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. ‘मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,’ या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. ‘आमच्यामध्ये सामील व्हा,’ असे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केले आहे. […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

सांगली: मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं […]

ताज्याघडामोडी

सरकार माझ्यावर पाळत ठेवतय; पण माझी हेरगिरी करून साध्य काय होणार? :संभाजीराजे छत्रपती

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी […]

ताज्याघडामोडी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण

मुंबई | मराठा समाजातील लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% EWC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य […]

ताज्याघडामोडी

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कायद्याला धरून नाही: प्रकाश आंबेडकर

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय कायद्याला धरून नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात […]

ताज्याघडामोडी

संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, संध्याकाळी संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यव्यापी दौरा केला. संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा […]

ताज्याघडामोडी

शरद पवार आणि खा.संभाजीराजे यांच्यात अवघ्या १० मिनिटाची भेट

मुंबई: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मराठा आरक्षण विरोधी डॉक्टरला केले लक्ष्य; कोल्हापुरात हॉस्पिटलची तोडफोड

कोल्हापूर:मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलची आज ‘ मराठा क्रांती मोर्चा ‘च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तसेच व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला.  एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या हॉस्पिटलवर धडक दिली. तिथे जाब विचारत हॉस्पिटलच्या नामफलकाची […]