ताज्याघडामोडी

सरकार माझ्यावर पाळत ठेवतय; पण माझी हेरगिरी करून साध्य काय होणार? :संभाजीराजे छत्रपती

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे.

संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहित नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाबाबत 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत ठोस भूमिका न घेतल्यास रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत.

याप्रसंगी आम्ही करोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा थेट इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला होता.दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्यावर पाळत राज्य सरकार ठेवतयं की, केंद्र सरकार याचा उल्लेख ट्विटमध्ये केलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *