शेतीचा फेरफार नोंदीसाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना कालगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तलाठी अनंदा नारायण गायकवाड यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज 26 जुलै रोजी कारवाई केली. एका तक्रारदाराने 8 जुलै रोजी समक्ष एक तक्रार दाखल करीत विकत घेतलेल्या शेतीचा फेर लावून देण्यासाठी संबंधित तलाठी अनंदा गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे […]
Tag: #crime
मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर पोलीस उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या चारही पोलीस हद्दीतील भीमा नदीकाठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू चोरी मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यातील विविध गावात आतापर्यत अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलिसांनी केलेल्या दिसून येतात.काही गावाच्या हद्दीत तर अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून सातत्याने […]
मतदारांना वाटले पैसे, कोर्टाने महिला खासदाराला सुनावली 6 महिन्यांची शिक्षा
निवडणुकांच्या वेळी अनेक उमेदवारांवर पैसे वाटण्याचा आरोप होतो. परंतु देशात पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधीवर या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीच्या महिला खासदार मलोत कविता यांना मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कवित्या या तेलंगाणातील महबुबाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. कविता यांच्यासह त्यांच्या एका सहकार्यालाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2019 […]
हातात शस्त्रास्त्रे घेउन व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवणे भोवले, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
दहशत माजविण्यासाठी हातात शस्त्रास्त्र घेउन व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रोहन रमेश घोलप (वय 21 रा. गोखले नगर )आणि अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय 30 रा. कसबा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध डेक्कन व फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवार, कोयता, चाकू बनविणारे व […]
माझ्या हॉटेलपेक्षा त्याच्या हॉटेलचा धंदा जास्त
पुण्यातील प्रसिद्ध गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. गारवा हॉलेटच्या शेजारी अशोका हॉटेल होतं. या हॉटेलच्या मालकांनी सराईत गुन्हेगार भाच्याला सुपारी देऊन गारबा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात लोणी काळभोर पालिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये […]
गुंड संदीप मोहोळ खूनप्रकरणात तिघांना ‘जन्मठेप’; गणेश मारणेसह 12 जणांची निर्दोष मुक्तता
गुंड संदीप मोहोळ याच्या खूनप्रकरणात तिघांना जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन पोटे, जमीर शेख, संतोष लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर, तिघा आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा निकाल दिला. टोळीच्या वर्चस्व वादातून गुंड संदीप […]
आमची परत बातमी दिली तर तुला जिवे ठार मारू !
भीमा नदीकाठच्या अनेक गावात वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करीत त्यांच्या शेतीतून वाट काढत अवैध वाळू उपसा करायचा,त्याच ठिकाणी साठा करायचा आणि शेतकऱ्याने विरोध केला तर त्याला दमदाटी करायची असे प्रकार सातत्याने होत असल्याची चर्चा आहे.अशातच पोलीस अथवा महसूलच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच तर ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून आला आहे त्या […]
गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल
गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून […]
मुळशी पॅटर्नची नक्कल करणारे स्टेट्स पडले महागात
गावात आपलीच हवा असावी एखादी हिरोईन टाईप गर्लफ्रेंड असावी अशी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनाही संख्या आपल्यात काही कमी नाही.कुणी स्पर्धा परीक्षांत यश मिळवून,सैनिक अथवा पोलीस भरती होऊन,विविध शालेय अथवा महाविद्यलयीन परीक्षांमध्ये यश मिळवून गावात नावलौकिक मिळवतात,शाश्वत हवा करतात.मात्र काही तरुण चित्रपटाप्रमाणेच जीवन असते असा समज करून घेत गुन्हेगारी वृत्तीचा अवलंब करत हवा करायला जातात,काही काळ आपल्या परिसरात […]
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा येतोय म्हणून पोलिसांनी मारली शिट्टी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरपूरला येत असल्यामुळे त्यांच्या वाहनांचा ताफा येत असलेल्या रस्त्यावर जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पंढरपूर-करकंब रस्त्यावरील आजोती पाटी येथे बदोबस्तासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने येणारी एक दुचाकी अतिशय भरधाव वेगाने येत असल्याचे आढळून आले,करकंबकडून मुख्यमंत्रांच्या गाड्यांचा कॅनवाय येत असल्याने पोलिसांनी भरधाव वेगातील दुचाकी थांबविण्यासाठी शिट्टी मारली खरी […]