गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर पोलीस उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या चारही पोलीस हद्दीतील भीमा नदीकाठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू चोरी मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यातील विविध गावात आतापर्यत अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलिसांनी केलेल्या दिसून येतात.काही गावाच्या हद्दीत तर अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असताना तेथील तलाठी,मंडल  अधिकारी,पोलीस पाटील याना त्याची भनक देखील कशी काय लागत नाही हे एक गौडबंगालच आहे.आज पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मुंढेवाडी तालुका पंढरपुर येथे केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या बिगर नंबरच्या पीकअप सह वाळू ताब्यात घेत दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात पो.कॉ.बालाजी कदम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीसह पो.ना. चवरे,पो.ना.क्षिरसागर हे तारापूर बिट मध्ये अवैध्य वाळू उपसा केसेस करणेकामी पेट्रोलिंग करित असताना मुंढेवाडी ता.पंढरपूर येथून भीमा नदी पात्रामधून अवैधरित्या वाळुचा उपसा करुन पिक अप मध्ये त्याचे मागिल टपामध्ये वाळू भरून अजनसोंड ता.पंढरपुर येथून गावातून वाळु चोरुन घेवुन पुढे जात आहे अशी माहिती मिळाली.हे पोलीस कर्मचारी अजनसोंड पाटी येथे आले असता समोरून एक पिक अप येत असताना दिसला दर पिकअपच्या पाठीमागील हौदामध्ये जावून पाहिले असता त्यामध्ये अर्धा ब्रास वाळू आढळून आली.

या प्रकरणी पिकअप चालक मालक नामे 1) उमेश विठ्ठल मोरे 2) दादा दगडू मोरे वय-31 वर्ष रा.मुंढेवाडी ता.पंढरपूर यांनी आपसात संगनमत करुन मौजे मुंढेवाडी ता.पंढरपूर यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम379,34सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *