गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा येतोय म्हणून पोलिसांनी मारली शिट्टी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरपूरला येत असल्यामुळे त्यांच्या वाहनांचा ताफा येत असलेल्या रस्त्यावर जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पंढरपूर-करकंब रस्त्यावरील आजोती पाटी येथे बदोबस्तासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने येणारी एक दुचाकी अतिशय भरधाव वेगाने येत असल्याचे आढळून आले,करकंबकडून मुख्यमंत्रांच्या गाड्यांचा कॅनवाय येत असल्याने पोलिसांनी भरधाव वेगातील दुचाकी थांबविण्यासाठी शिट्टी मारली खरी पण थांबण्याच्या प्रयत्नात वेगातील दुचाकी घसरून दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

या बाबत बंदोस्तासाठी असलेले पोलीस पो.कॉ. दत्तात्रय शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पो.कॉ. दत्तात्रय शिंदे व पो.कॉ. ब्रम्हदेव प्रभुजी वाघमारे या दोघांना करकंब पोलीस ठाणे हद्दीत आजोती पाटी येथे रोड बंदोबस्ता करीता नेमले होते.20/30 वा चे सुमारास मुख्यमंञी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा कँनवाय करकंब पंढरपुर रोडने येत होता.त्यावेऴी एक मोटार सायकल पंढरपुर कडुन भरधाव वेगात येत होती.शिटी वाजवुन व हाताचा इशारा करुन मोटार सायकल बाजुला घेण्यास सांगितले.परंतु बिगर नंबरची मोटार सायकल भरधाव वेगात असल्यामुळे थांबवता न आल्याने मोटार सायकल घसरून मोटारसायकल वरील दोघेही खाली पडले मोटार सायकल रोडच्या बाजूला घेतली मोटार सायकल चालकास नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव किरण दत्तात्रय हेलाडे वय- 30वर्षे व अर्जून दुर्यधन बोंगळ वय- 42वर्षे दोघेही रा. बहिरवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर असे असल्याचे सांगण्यात आले.

या दोन्ही इसमांविरोधात भादवि. कलम. 279, 337, 338, व मोटार वाहन कायदा कलम184, 185 प्रमाणे पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *