गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुळशी पॅटर्नची नक्कल करणारे स्टेट्स पडले महागात 

गावात आपलीच हवा असावी एखादी हिरोईन टाईप गर्लफ्रेंड असावी अशी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनाही संख्या आपल्यात काही कमी नाही.कुणी स्पर्धा परीक्षांत यश मिळवून,सैनिक अथवा पोलीस भरती होऊन,विविध शालेय अथवा महाविद्यलयीन परीक्षांमध्ये यश मिळवून गावात नावलौकिक मिळवतात,शाश्वत हवा करतात.मात्र काही तरुण चित्रपटाप्रमाणेच जीवन असते असा समज करून घेत गुन्हेगारी वृत्तीचा अवलंब करत हवा करायला जातात,काही काळ आपल्या परिसरात हवाही करतात खमक्या पोलीस अधिकारी किंवा विरोधक भेटला कि थेट पायाशी लोळण घेत कुठल्यातरी दुकानात नोकरी पत्करतात किंवा छोट्या मोठ्या धंद्याला लागतात.

मुळशी पॅटर्न हा बहुचर्चित मराठी सिनेमा पाहून अनेकांना राहुल्या होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत मात्र शेवटी राहुल्याला देखील कुणीतरी पळवू पळवून तोडते हे ते विसरून गेले आहेत.अशा राहुल्याचा आदर्श घेत मुळशी पॅटर्न टाईप स्टेट्स ठेवून हवा करू पाहणाऱ्या एका तरुणांच्या टोळक्याला कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी पोलिसांनी असाच हिसका दाखवला असून कबनूर गावातल्या काही तरुणांनी मुळशी पॅटर्न स्टाईल मारत हातात बंदुक घेत डायलॉग असलेला स्टेट्स ठेवला,याला  लाईक भरपूर आल्या पण हेच स्टेट्स  पोलिसांच्या बघण्यात आलं आणि त्यांना थेट लॉकअपची हवा खावी लागली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *