गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आमची परत बातमी दिली तर तुला जिवे ठार मारू !

भीमा नदीकाठच्या अनेक गावात वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करीत त्यांच्या शेतीतून वाट काढत अवैध वाळू उपसा करायचा,त्याच ठिकाणी साठा करायचा आणि शेतकऱ्याने विरोध केला तर त्याला दमदाटी करायची असे प्रकार सातत्याने होत असल्याची चर्चा आहे.अशातच पोलीस अथवा महसूलच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच तर ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून आला आहे त्या शेतकऱ्यास देखील कायदेशीर कारवाईचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी वाळू चोरांनी वाळू चोरीतून अफाट माया कमवून त्या बळावर गावात दहशत निर्माण केली असल्याने त्यांच्या विरोधात ब्र शब्द काढण्याची हिम्मत देखील कोणाची होत नसल्याचे आढळून येते.अशातच पोलीस कारवाई झाली कि पोलिसांना माहिती कुणी दिली याचा शोध आधी घेतला जातो आणि बऱ्याच वेळा संशयावरून मारहाणीच्या घटना घडताना दिसून येतात.मात्र वाळू चोरांच्या दहशतीमुळे त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यास अनेक शेतकरी धजावत नसल्याची चर्चा आहे.

एकीकडे कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटकोर अमलबजावणी करण्यात पोलीस प्रशासन व्यस्त असताना भीमा नदीकाठावरुन होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी दक्ष रहावे लागत आहे.एखाद्या गावाच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कारवाईसाठी धाव घेतात,कारवाई करतात आणि कारवाई नंतर पोलिसांना माहिती कुणी दिली या संशयावर गावातील अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

असाच प्रकार पंढरपुर तालुक्यातील पुळूज येथे घडला असून पुळूज येथील विजय मारुती गावडे यांना माझा वाळुने भरलेला टेम्पो परत एकदा चार दिवसापुर्वी पोलीसांनी पकडुन नेला आहे.सदर बातमी तुच दिली आहे,तु जर पोलीसांना आमची परत बातमी दिली तर तुला जिवे ठार मारीण अशी धमकी देत बेदम मारहाण करण्यात आल्याची फिर्याद विजय मारुती गावडे यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.फियार्दी विजय गावडे यांना पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल येथे पाठविण्यात आले होते.

या प्रकरणी 1)महादेव प्रभाकर शेंडगे 2)आण्णा प्रभाकर शेंडगे 3) नितीन बसवेश्वर म्हमाणे तिघे रा पुळुज ता पंढरपुर यांचे विरुध्द भादंवि ३२३,३२४,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *