ताज्याघडामोडी

धक्कादायक! पोलिओ लसऐवजी मुलांना पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ : चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या पोलिओ लसीऐवजी मुलांना सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुऴे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा भयंकर प्रकार घडला. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी पोलिओ लसीकरण केंद्रावर ही घटना समोर आली.

1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी सॅनिटाझर पाजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे 12 मुलांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

या मुलांना पोलिओचा डोस दिल्यानंतर उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी हे गौडबंगाल समोर आलं. या प्रकरणी यवतमाळच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून दोन पोलिओचे दोन थेंब दिले जातात. 2 फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते. 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये काही मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 

या लसीकरण मोहिमेला यवतमाळमध्ये गालबोट लागलं आहे. तब्बल 12 मुलं पोलिओ लस घेतल्यानंतर त्रास झाला. या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मुलांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तर या प्रकरणी कोणाची चूक आहे हे शोधून काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा प्रकार घडला तेव्हा आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *