ताज्याघडामोडी

आधी ठरलं गोल्डन टी हॉटेल नंतर बोलावलं रेस्ट हाऊसला

पालकमंत्र्यांनी जिथे दिला होता कारवाईचा इशारा तिथेच स्वीकारली लाखाची लाच

पालकमंत्र्यांनी जिथे दिला होता कारवाईचा इशारा तिथेच स्वीकारली लाखाची लाच

पंढरपूर तालुक्यात सातत्याने अवैध वाळू उपसा आणि अवैध मुरूम उपसा हा कायम चर्चेचा विषय.पंढरपूर पोलीस उपविभागात अशा प्रकारे होणाऱ्या अवैध गौण खनिज उपशावर सातत्याने पोलीस कारवाई होताना दिसून येते,गुन्हे दाखल होताना दिसून येतात.तर अनेक वेळा वाहनेही ताब्यात घेतलेली दिसून येतात तर अधून मधून आणि क्वचितपणे महसूल प्रशासन देखील कारवाई करताना दिसून येते पण पोलीस कारवाई पेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे.पंढरपूर तालुक्यात वाळू चोरी बरोबरच अवैध मुरूम उपसा देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा सातत्याने होत आली.आणि यातूनच ‘आर्थिक घडामोडी’ घडत असल्याचेही बोलले जात आले.काल लाचलुचपत विभागाने पंढरपूर शासकीय विश्राम गृह येथे केलेल्या कारवाईत अशाच एका घडामोडीवर शिक्का मोर्तब झाले आहे असेच म्हणावे लागेल.मात्र लाच स्वीकारण्यासाठी पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहाचा वापर केला जातोय हि बाब गंभीर आहे.विशेष बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे नोव्हेंबर महिन्यात पंढरपूरच्या शासकीय विश्राम गृहयेथे आले असता.पत्रकारांनी त्यांना पंढरपूर तालुक्यात सुरु असलेल्या गौण खनिज उपशाकडे महसूल प्रशासन गांभीर्याने पहात नाही हि बाब निदर्शनास आणून दिली असता दोषी तलाठी व मंडल अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता.इतरत्र ड्युटीवर असताना अनेक शासकीय कर्मचारी येथे तळ ठोकून असतात त्याबाबत आता तरी  गंभीरतेने विचार केला जाणार का असाच सवाल उपस्थित होत आहे.
         काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेल्या इसमास आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रथम गोल्डन टी हॉटेल येथे येण्यास सांगितले.तेथे उपस्थित असलेल्या शरद मोरे याने फिर्यादीस मोटार सायकलवर बसवून मॅकेनिक चौक येथे नेले व फिर्यादीस सदर रक्कम ‘तिसऱ्या’कडे देण्यास सांगितली.त्यावेळी फिर्यादीने सदर ‘तिसऱ्या’कडे  पैसे देण्यास नकार देत आपण मंडल अधिकारी रणजित मोरे यांच्याकडे पैसे देऊ असे सांगितले असता पंकजने मंडल अधिकारी मोरे यास फोन केला असता रणजित मोरे याने त्यांना शासकीय रेस्ट हाऊस येथे येण्यास सांगितले.त्या ठिकाणी फिर्यादीने लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शविताच मंडल अधिकारी रणजित मोरे याने सदर रक्कम शरद मोरेकडे देण्यास सांगितले आणि याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
      या बाबत ‘तिसऱ्या’ व्यक्तीची चौकशी केली असता,चलनाची रक्कम असावी असा समज झाल्याचे त्यांनी लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक यांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *