प्रथम क्रमांकाने भारतात उत्तीर्ण झाल्याबद्दल पंढरपूर सह जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव
पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर येथील कवडे अकॅडमी आयडियल प्ले अबॅकस इंडिया प्रा .लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सन – 2025 या वर्षात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरीय लेव्हल अबँकस कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेत पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थी स्वराज प्रतापसिंह खंडागळे हा भारतात पहिला आला आहे.
या अबॅकस स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी स्वराज खंडागळे हा पंढरपुरातील नामांकित आदर्श प्रार्थमिक विद्यालयात शिक्षण घेत असून तो इयत्ता तिसरी या वर्गात शिकत आहे. पंढरपूर येथील कवडे अकॅडमी या संस्थेने राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. आदर्श प्राथमिक विद्यालयातील स्वराज खंडागळे या विद्यार्थ्यांने सहभागी होऊन सहा मिनिटात 100 प्रश्न सोडून या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला असून महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याबद्दल कवडे अकॅडमी आयडियल प्ले अबॅकस या संस्थेकडून त्यांना बक्षीस वितरण पारितोषिक समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात प्रथम आलेला स्वराज खंडागळे व पालक यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला . या अगोदरही स्वराज खंडागळे यांने सन:- 2024 रोजी ही घेण्यात आलेल्या अबॅकस या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुभाष माने सर यांच्या अध्यक्षते खाली तर वस्तू बिल्डरचे अँड. डेव्हलपर्सचे संस्थापक अजित कंड्ररे, योग अभ्यासक आलिशा कंडरे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक म्हणून कवडे अकॅडमी संस्थेच्या मालती कवडे व चैताली कवडे मॅडम व सर यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते. स्वराज खंडागळे यांचे वडील प्रतापसिंह खंडागळे माढा येथील कुर्मदास सहकारी साखर कारखान्यात शेती विभागात काम पाहत आहेत. स्वराज खंडागळे हा मूळ संगेवाडी ता. सांगोला येथील रहिवासी आहे .या स्पर्धेत आदर्श प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी स्वराज खंडागळे यांनी भारत देशात प्रथम क्रमांक पटकावून यश प्राप्त केल्याबद्दल आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घंटे मॅडम, वर्ग शिक्षिका सोनाली देशपांडे मॅडम, श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अँड. धनाजीराव साठे, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मीनलताई साठे, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई राजाराम जाधव, पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सिद्धेवाडी,ता. पंढरपूर अध्यक्ष नितीन पाटील गुरुजी, भोसे (कं) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुदामती कोरके, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजारराव आसबे, मुख्य शेती अधिकारी पी.जी शिंदे तसेच कारखान्यातील इतर अधिकारी, कर्मचारी यांनी या यशाबद्दल फोनद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास कवडे अकॅडमी या संस्थेतील सर्व सहकारी, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.