ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे ‘कोषागार दिन’ साजरा

ढरपूर, दि. 01:-  जमा व खर्च  लेखा परिक्षण तसेच त्यांचे लेखांकन व संकलन करण्यासाठी 1 जानेवारी 1962 रोजी लेखा व कोषागार संचालनालयाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाने 1 फेब्रुवारी 1965 पासून, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना केली. तेव्हा पासून दरवर्षी हा दिवस कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पंढरपूर उपकोषागार कार्यालयाच्या वतीने दिनांक 01 फेब्रुवारी 2021  रोजी ‘कोषागार दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला.

यावेळी कार्यक्रमास  उपविभागीय पोलीस अधिकारी  विक्रम कदम, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते, उपअभियंता हनुमंत बागल, उपनिबंधक श्री.तांदळे, पोलीस निरिक्षक किरण अवचर, शहर पोलीस निरिक्षक अरुण पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पुर्वी जिल्हा न्यायाधिश के.व्ही बोरा, न्यायाधीश ए.पी कराड यांनी कोषागार दिनी उपकोषागार कार्यालयास भेट देवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते यांनी  देयके वेळीच पारित होतील व देयकास आक्षेप काय लागणार नाही याबाबत तसेच लेखा व सेवाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपकोषागार कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक जी.एम सांगळे, लेखा लिपिक ए.एस. तांदळे  यांनी परिश्रम घेतले. यावेळी सहाय्यक फौजदार आर.डी. शेख, पोलीस हेड कॉन्टेबल  बी.एस.शेंडगे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *