श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख यांना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स तर्फे राज्यस्तरीय “इनोव्हेटिव टीपीओ पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.
लोणावळा येथे झालेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स व विस्डोम करिअर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
आमदार अमित गोखले, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव व अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या हस्ते प्रा. शेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, पोलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच कर्मयोगी समूहातील सर्व महाविद्याल्यातील सर्व प्राचार्य प्राध्यापक यांनी प्रा. शेख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.