ताज्याघडामोडी

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी, ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांचं भाकित

भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे.सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत.

प्रसिद्ध जीवाणूतज्ञ डॉ. टी जॉन जेकब यांच्या भाकितामागे असलेला विश्वास हा सीएसआयआरच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसच्या महासाथीची तिसरी लाट येईल का यावर सीएसआयआरने अभ्यास केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष लवकरच जाहीर होणार आहेत.

जवळपास अशाच प्रकारचा विश्वास जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही व्यक्त केलाय. भारतातील कोरोनाव्हायरस आता कमकुवत झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय, तसंच भारतीय आता कोरोनासोबत जगायला शिकले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्याकडून मिळालेला हा दिलासा खूपच महत्वाचा आहे. आयसीएमआरच्या प्रगत विषाणूविज्ञान संशोधन केंद्राचे माजी डॉ. जॉन जेकब यांनीही आपल्या संशोधनातून डॉ. स्वामिनाथन यांच्याच मताला दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *