पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेशं लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी […]
गुन्हे विश्व
सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा ; ३३ जणांना पोलिस कोठडी
पुणे : सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याच्या अंत्ययात्रेत बेकायदा जमाव जमवून दुचाकी रॅली काढत करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ३३ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि आरोपींना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ही मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निकालाविरोधात […]
धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर […]
24 वर्षीय नवविवाहित डॉक्टरची आत्महत्या, वडिलांच्या नावे सुसाईड नोट
जालना : नवविवाहित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. 24 वर्षीय डॉक्टर प्रांजल कोल्हे हिचा नुकताच विवाह झाला होता. वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित प्रांजलने आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल […]
सातबाऱ्यावर नोंदीसाठी १० हजाराची लाच, वरून दारू मटणाच्या पार्टीची मागणी
गलेगठ्ठ पगार असूनही लाचखोरीच्या महाराष्ट्रातील महसूल विभागाचे कर्मचारी सर्वाधिक आघाडीवर असतात हे राज्याच्या लाचलुचपत गेल्या अनेक वर्षात केलेल्या कारवायातुन स्पष्ट झाले आहे.शेतजमीन,प्लॉट,फ्लॅट आदींच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार नोंदवल्यानंतर,वाटणीपत्र झाल्यानंतर सर्वाधिक अडवणूक होते ती फेरफार नोंदीची.या नोंदीच्या प्रक्रियेत सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो,लाचेची मागणी केली जात असल्याचे शेकडो प्रकार वर्षाकाठी उघडकीस येतात.असाच प्रकार बुलढाणा […]
तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून अनेक संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जातायत. एवढेच नाही तर नियम मोडल्यामुळे जाब विचारल्यानंतर अनेकजण पोलिसांशी हुज्जतसुद्धा घालत आहेत. त्याची प्रचिती औरंगाबादेत आली आहे. मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन तरुण आणि […]
डॉक्टर दांम्पत्याचा दिवसाढवळ्या गोळ्याघालून खून, घटनेचा थरार सीसीटिव्हीत कैद
भरतपूर येथे दिवसाढवळ्या एका डॉक्टर दांम्पत्याचा गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शहरातील हिरदास बस स्थानकाजवळी भर चौकात घडला असून दुचाकीवरुन दोघांनी येऊन डॉक्टर दांम्पत्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली व आरोपी फरार झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 4.45 वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा […]
दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलिसाला नेले फरपटत
पिंपरी चिंचवड परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्सची विचारणा केली असता. आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी […]
तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून पत्नीचे आयुष्य संपवले
पुणे: पुण्यातील देहूगावात एका नवविवाहित जोडप्यात झालेल्या भांडणातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. अगदी किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला. पूजा वैभव लाकमाने असे मयत तरुणीचे नाव आहे. पूजा आणि वैभव यांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. त्यानंतर हे दोघे देहूगावामधील साई नगरी, वडाचा मळा याठिकाणी ते राहत होते. मात्र, अवघ्या काही […]
पंढपुरात दातेंच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला,दुचाकी घेऊन चोरटा पसार
गेल्या दीड महिन्यापासून पंढरपुर शहरात कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी होत असतानाच शहरात मोटार सायकल चोरीच्या घटनात मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहरातील रस्ते सामसूम असल्याचा फायदा उठवत चोरटे आपला कार्यभाग साधत असून पंढरपुर शहरातील मनीषा नगर येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सौरभ विक्रम दाते हे कुटूंबासहीत पुणे येथे गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे […]











