गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीच्या लग्नमंडपात केला डान्स भाजपच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : भाजप आमदार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुलीच्या मांडव टहाळीतील जोरदार डान्स महागात पडण्याची शक्यता आहे. कारण महेशं लांडगे यांच्यासह 60 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका अधिकाऱ्याचाही डान्स व्हिडीओ

आमदार महेश लांडगे बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे आमदार लांडगे यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत. आमदारांच्या कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित विधींच्या वेळी लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत इतरांनीही नृत्य केलं. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी होते. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार आणि अधिकारी दोघांवर आता टीकेची झोड उठत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *