गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित रुग्णाच्या मुलाने मदत मागितल्यानंतर तब्बल 12 तासांनी या रुग्णाची हॉस्पिटलमधून रुग्णाची सुटका करण्यात आली. घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या गंगापूर रोडवरील मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या श्रीधर दिघोळे नामक रुग्णाच्या मुलाचा फोन आला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोलापुरातील नामचीन गुंडाची येरवडयात रवानगी 

गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अनेक कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येत असून राजकीय हस्तक्षेपाची पर्वा न करता सोलापूर शहर पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.ज्या आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत,अशा आरोपीना सोलापूर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कमटॅक्स अधिकाऱ्याच्या नावाने राज्यभरात घातला गंडा; आंतरराज्य गुन्हेगाराला अटक

इन्कमटॅक्स अधिकारी बोलत असल्याचा फोन करून राज्यभरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य खंडणीखोराला खंडणी विरोधी युनीट दोनने अटक केली. त्याने मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूरमधील व्यावसायिकांना इन्कमटॅक्स अधिकारी आणि फूड ऑफिसर असल्याचे सांगत फसवणूक केली आहे. त्याच्याविरूद्ध अंधेरी, बंगलोर, चेंबूर, लष्कर पोलीस ठाण्यातंर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. राहुल किरण सराटे (रा. चेंबुर इस्ट, मुंबई) याला अटक करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड, 13 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाच्या चार महिन्यातच पत्नीची आत्महत्या, काही तासात पतीनेही घेतला गळफास

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर काही तासांतच पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात घडली आहे.शिल्पा अजय जाधव (वय 28), अजय कचरदार जाधव (वय 32) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. अजय व शिल्पा यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आज दुपारी शिल्पाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच अजयने मोरे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम,पंढरीत दुचाकी चोरानी साधली संधी

गेल्या दोन महिन्यापासून पंढरपूर शहरातुन दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात घट झाली होती.पण आता शहरात लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम असल्यामुळे दुचाकी चोर सक्रिय झाले असावेत.पंढरपूर शहरातील सारडा भवन परिसरातील रहिवाशी गजानन पुंडलीक गुळीक यांच्या मालकीची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल नं.MH 13 AM 0486 हि दुचाकी चोरट्यानी रात्री ११ ते १० या कालावधीत लंपास केली असून या प्रकरणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार; सुदैवाने थोडक्यात बचावले

पुणे – आज एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भरदिवसा गोळीबार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे तान्हाजी पवार असे नाव आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचे चिंचवड स्टेशनजवळ कार्यालय आहे. एका व्यक्तीने त्याच परिसरात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केमिस्ट अधिकाऱ्याचा मारहाणीनंतर मृत्यू; पोलिसांनी केली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अटक

साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

निर्दयीपणाचा कळस! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी शीतपेयातून दिलं विष; वधूचा प्रताप

यवतमाळ, 11 मे: येथील एका वधुनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयातून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी वधुनं आपला भाऊ आणि मैत्रिणीच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयामध्ये विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुदैवानं 10 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर वरानं मृत्यूवर विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यानं रुग्णालयातून बरं होताचं, थेट पोलीस स्टेशन गाठून भावी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) […]