गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम,पंढरीत दुचाकी चोरानी साधली संधी

गेल्या दोन महिन्यापासून पंढरपूर शहरातुन दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात घट झाली होती.पण आता शहरात लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम असल्यामुळे दुचाकी चोर सक्रिय झाले असावेत.पंढरपूर शहरातील सारडा भवन परिसरातील रहिवाशी गजानन पुंडलीक गुळीक यांच्या मालकीची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल नं.MH 13 AM 0486 हि दुचाकी चोरट्यानी रात्री ११ ते १० या कालावधीत लंपास केली असून या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
           
पंढरपूर शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत वाढले होते.परंतु गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार अतिशय विरळ होते.सध्या शहरात कडकडीत लॉकडाऊन असल्याने रस्ते सामसूम असतात.त्याचाच फायदा दुचाकी चोरांनी घेतला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *