लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाची आठवण झाली मनतू पोलीस […]
गुन्हे विश्व
मित्रांमध्ये भांडणाचा भडका, मित्राचे वडील समजवायला आले त्यांच्यावर गोळीबार
नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरलं आहे. शुल्लक कारणावरून एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्राच्या वडिलांवर गोळी झाडली. गोळी कमरेला लागल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली. साहेबराव जोगदंड असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.या घटनेनंतर पारिसरात खळबळ उडाली होती. जखमी […]
वाळू माफियांची दादागिरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांना डंपरने चिरडण्याचा प्रयत्न
बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ यांचे […]
शेतात बायकोवर वार; शिर हातात घेऊन गावात आला; दारात ठेवून कित्येक तास बसून राहिला
पतीनं पत्नीचं शिर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना ओदिशातील गजपती जिल्ह्यात घडली आहे. दाम्पत्य सारा गावाजवळ असलेल्या शेतात गेले होते. तेव्हा तिथे त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पतीनं पत्नीची हत्या केली. तिचं शिर धडावेगळं केलं. पत्नीचं शिर घेऊन पती गावात पोहोचला. उर्मिला कारजी असं मृत महिलेचं नाव असून चंद्रशेखर कारजी असं आरोपी पतीचं […]
महिला देवदर्शनाला जात होती, रस्त्यात गाठून तरुणाने पतीसमोर केली भलतीच मागणी, पती-पत्नी हादरले
राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. महिला आपल्या पतीबरोबर जात असताना दोन तरुणांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. ‘तू तुझ्या पतीसोबत दर्शनाला जाऊ नको, माझ्यासोबत दर्शनाला चल’, असं म्हणत पतीसोबत दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली […]
मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं
कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत तरुणाने दोघींचा खून केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. आराध्या हेमंत भूषण (वय २३ वर्ष) असे मयत पत्नी तर सुशीलादेवी भूषण […]
जुगारात मोबाईल हरला, मित्राच्या मदतीने फोन सोडला; लॉक उघडताच घृणास्पद कृत्य समोर
जुगाराचा नाद लागलेल्या एका विकृत तरुणाचे घृणास्पद कृत्य मोबाईलमुळे उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विकृत आरोपी मुलींचे फोटो इंस्ट्राग्रामधून कॉपी करायचा. फोटोला एडिट करत मुलींच्या फोटोच्या चेहऱ्याखालील भागाचे अश्लील फोटोत रूपांतर करत आपल्या मोबाईलच्या गॅलरीत ठेवत होता. मात्र, जुगारात तो मोबाईल हरल्याने त्याचा विकृतपणा समोर आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने उल्हासनगर पोलीस […]
विवाहबाह्य संबंधाचा हादरवणारा शेवट; तरुणीने प्रियकराच्या पत्नीची केली भयानक अवस्था
एका ब्युटीशियनने तिच्या विवाहित प्रियकराच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तिच्या प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला.दुसरीकडे अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पतीनेही प्रेयसीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या बहाण्याने विवाहित प्रियकराने तिला पाच वर्षे लिव्ह इनमध्ये ठेवल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे. प्रेयसी 20 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल […]
लुडो खेळता-खेळता सूत जुळलं, जावई-सासूची लव्ह स्टोरी सुरु, भेटायला गेला अन् अनर्थ घडला…
लुडो खेळताना एका जावयाला आपल्याच चुलत विधवा सासूवर प्रेम जडलं. हा जावई गुपचूपपणे सासूला भेटायलाही जायचा. पण, ग्रामस्थांना याची माहिती झाली आणि मग या जावयासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्याला वाटलं की रात्री अंधाराचा फायदा घेऊन आपल्या प्रेयसी सासूला भेटून येईल. मात्र, घडलं भलतंच. संपूर्ण प्रकरण बिहारच्या जमुईच्या लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. बुधवारी […]
ते कामावर गेले, पण दंगलखोरांनी रस्त्यात संपवलं, घरच्यांना पेपरात कळलं, ते जग सोडून गेले..!
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत १३ मे रोजी अकोल्यात दोन गटात झालेल्या हिंसक मारामारीत आपला जीव गमावलेल्या ३९ वर्षीय विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात त्यांचा फोटो पाहूनच त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. कुटुंबातील एकमेव कमावणारा, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा गायकवाड, शनिवारी (१३ मे) रोजी रात्री घरी परतत असताना सोशल मीडिया पोस्टवर […]











