गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ते कामावर गेले, पण दंगलखोरांनी रस्त्यात संपवलं, घरच्यांना पेपरात कळलं, ते जग सोडून गेले..!

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत १३ मे रोजी अकोल्यात दोन गटात झालेल्या हिंसक मारामारीत आपला जीव गमावलेल्या ३९ वर्षीय विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात त्यांचा फोटो पाहूनच त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.

कुटुंबातील एकमेव कमावणारा, इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा गायकवाड, शनिवारी (१३ मे) रोजी रात्री घरी परतत असताना सोशल मीडिया पोस्टवर दोन समुदायांमधील हिंसाचाराच्या वेळी त्याच्यावर दगड आणि पाईपने वार करण्यात आले. आम्ही रविवारी एका स्थानिक वृत्तपत्रात त्याचे छायाचित्र बघेपर्यंत आम्हाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला फक्त हे माहित होते की तो जखमी आहे आणि रुग्णालयात आहे. आम्ही सकाळी शासकीय रुग्णालयात धाव घेतली जेथे आम्ही त्याचा मृतदेह पाहिला, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

विलास गायकवाड…. अकोल्यातील हरिहरपेठ भागातील विलासचं घर आता पार सुनंसुनं झालंय… विलास ईलेक्ट्रीशियनचं काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकायचे. मात्र, शनिवारी (१३ मे) दुपारी ४ वाजता कामावर गेलेले विलास गायकवाड नंतर घरी परतलेच नाहीत. नंतर दुसऱ्या दिवशी घरी पोहोचलं ते त्यांचं पार्थिवच…

शनिवारी दुपारी ४ वाजता विलास एका ईलेक्ट्रिक फिटींगच्या कामासाठी जातो असं सांगून गेले. याचवेळी संध्याकाळी १० च्या सुमारास ते घरी परतत होते. याचवेळी हरिहरपेठ भागात दंगेखोरांचा मोठा हैदोस सुरू होताय. बेफाम दंगेखोरांनी विलास यांच्या डोक्यात दगड घातला. अन तिथेच सारं संपलं.

अकोला शहरातील जूने शहर भागात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवादामुळे १३ मे रोजी दोन गटात तूफान दगडफेक झाली होती. शेकडो लोक अमोरासमोर आले असून दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत होते. दोन गटात झालेल्या तुफान दगडफेक आणि दंगलीमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले होते तर ३० लोक किरकोळ जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *