गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला देवदर्शनाला जात होती, रस्त्यात गाठून तरुणाने पतीसमोर केली भलतीच मागणी, पती-पत्नी हादरले

राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. महिला आपल्या पतीबरोबर जात असताना दोन तरुणांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. ‘तू तुझ्या पतीसोबत दर्शनाला जाऊ नको, माझ्यासोबत दर्शनाला चल’, असं म्हणत पतीसोबत दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्णपुरा मैदान या ठिकाणी घडली. दरम्यान, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यामध्ये दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश काशीराम चिपोल, विक्की बरेलीकर दोघेही(रा. रोहिदास पुरा जुना मोंढा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये राहते. दरम्यान, ही महिला कर्णपुरा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी पती सोबत जात होती. यावेळी दोन तरुणांनी या पत्नी पत्नीचा पाठलाग केला. एवढ्यावरच न थांबता कर्णपुरा मंदिराच्या मैदानासमोरच त्यांनी पीडित महिलेला थांबवत ‘तू तुझ्या पतीसोबत दर्शनासाठी जाऊ नको माझ्यासोबत दर्शनाला चल’ असे म्हटले.

ही बाब ऐकून पती व महिलेला धक्का बसला. दरम्यान त्यांनी दोन्ही तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच विक्की बरेलीकर याने पीडितेच्या पतीला मारहाण केल्याचा देखील उल्लेख महिलेने दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या अनपेक्षित प्रकरणाने पती व महिला प्रचंड घाबरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *