लेकीचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या दारामध्येच तिच्या पार्थिवावर माहेरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. बारामती तालुक्याच्या सांगवी या गावात हा प्रकार घडला. सासरच्या मंडळीनं मुलीचा छळ करून तिला विष पाजून मारल्याचा माहेरच्या मंडळींचा संशय आहे. त्यामुळं रागाच्या भरात माहेरच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे सासरच्या दारातच मुलीचा अंत्यसंस्कार केला. सांगवी येथील गीतांजली नावाच्या विवाहितेच्या पोटात विषारी औषध गेल्याची घटना घडली […]
गुन्हे विश्व
तरुणास बेदम मारहाण करणाऱ्या लाचखोरी प्रकरणातील ‘त्या’डीवायएसपीची चौकशी करण्याचे आदेश
हॉस्पिटलमधील वादावादीवेळी संपूर्ण गवळी समाजाची आईबहीण काढणारा जालन्याचा डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश औरंगाबाद रेंजचे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले आहेत. 9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातील दीपक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात […]
प्रेम प्रकरणामुळं आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी; FB LIVE करत तरुणाची आत्महत्या
जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका मुलीने लग्नाच्या दिवशीच आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका युवकाने प्रेम प्रकरणात आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली आहे. भोकरदान तालुक्यातील वालसावंगी शिवारात ही घटना घडली. वालसंगी शिवारात तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आत्महत्या करत […]
सरकारी जमीन विकून लाटले जवळपास 16 लाख; भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला अटक
पुणे, 28 मे: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जमीन परस्पररित्या विकून तब्बल 15 लाख 80 हजार रुपये लाटल्याप्रकरणी भाजपचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नगरसेवक लांडगे याने संबंधित जमीन स्वतःच्या नावे नसताना, बनावट कागदपत्रे तयार करून ती जमीन विकली आहे. विशेष म्हणजे ज्यांना ही जमीन विकली आहे. त्यांना संबंधित […]
सख्खा भाऊ पक्का वैरी, प्रॉपर्टीच्या वादातून आईला शिवीगाळ, भावाच्या डोक्यावर लोखंडी रॉड घालुन केली हत्या
उल्हासनगरात मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाने भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सख्खा भाऊ संपत्तीच्या वादातून इतक्या टोकाचा निर्णय कसा घेऊन शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना सतावत आहे. नेमकं काय घडलं? संतोष कदम असं […]
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून; मृतदेह गाडीत जाळण्याचा प्रयत्न
पुणे – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. धामणी येथील पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सचिन जाधव असे हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला आहे. या घटनेची नोंद मंचर पोलिसात करण्यात आली आहे. बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी अशी […]
बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत पैशाची मागणी
घाटकोपरमध्ये रहाणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला त्याच्या अट्टल गुन्हेगार असलेल्या मित्राने एक टोळीच्या मदतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याच्या फोनवर एक अज्ञात तरुणीचा फोन आला. त्या तरुणीने पीडित तरुणाशी ओळख वाढवली. त्यानंतर ते एकमेकांना लॉजवर भेटले. लॉजबाहेर येताच तरुणीच्या साथीदारांनी त्याला अपहृत केले आणि तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.पैसे दिले नाहीत तर तुझ्यावर […]
मराठा आरक्षण विरोधी डॉक्टरला केले लक्ष्य; कोल्हापुरात हॉस्पिटलची तोडफोड
कोल्हापूर:मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलची आज ‘ मराठा क्रांती मोर्चा ‘च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तसेच व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या हॉस्पिटलवर धडक दिली. तिथे जाब विचारत हॉस्पिटलच्या नामफलकाची […]
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड गाडी जाळण्याचा प्रयत्न, बुलडाण्यात खळबळ
बुलडाणा, 26 मे : या ना त्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर […]
धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून
प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने मयताच्या पत्नीच्या मदतीने प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अमरावती जिल्ह्यातील ही घटना असून अण्णा उत्तम जाधव (35, रा.बाजारसावंगी, ता. रत्नपूर) यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज शिवारात लोकविकास शुगर मिल्सच्या जागेवर सोमवारी आढळला होता. अण्णाचा खून झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने […]











