गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणास बेदम मारहाण करणाऱ्या लाचखोरी प्रकरणातील ‘त्या’डीवायएसपीची चौकशी करण्याचे आदेश

हॉस्पिटलमधील वादावादीवेळी संपूर्ण गवळी समाजाची आईबहीण काढणारा जालन्याचा  डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक  प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश  औरंगाबाद रेंजचे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले आहेत.
    9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातील दीपक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात काचा फोडून धुडगूस घातल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात 3 ते 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.पोलिसांच्या दाव्यानुसार रुग्णालयात तोडफोड केल्याने मारहाण केल्याचे सांगितले असले तरी या प्रकरणी अद्याप कोणाला आजवर अटक का झाली नाही हा प्रश्नच अनुत्तरित आहे.      
जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी संदर्भात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *