कोरोना पॉझिटिव्ह असताना रक्तदान शिबीर घेऊन जंगी वाढदिवस साजरा करणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राकेश श्रीपाल कुरणे याच्यावर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हैसाळ तलाठी सुधाकर कृष्णा कुणके यांनी फिर्यादी दिली आहे.राकेश कुरणे हा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांनी घरी क्वारंटाईन होण्याच्या […]
गुन्हे विश्व
देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये दंड […]
धक्कादायक ! लग्नाआधीच तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला पाजलं विष; कारण वाचून बसेल धक्का
यवतमाळ – राज्यात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अनेकजण लग्नासाठी खोळंबले आहेत. सध्या लग्नांचा कालावधी आहे. तर अनेकांनी लग्न उरकून घेतले आहे. मात्र विदर्भातील यवतमाळमधून लग्नासंदर्भातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीने लग्नाआधीच भावी नवऱ्यावर विषप्रयोग केल्याचं उघड झालं आहे. लग्नाच्या चार दिवस आधी ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याला शितपेयातून विष […]
धक्कादायक.! तडीपार गुंडाने केला पोलीस अधिकाऱ्याचा खून, तीक्ष्ण हत्याराने केले वार
पुणे – पाच वर्षांपासून तडीपार असलेल्या गुंडाने बुधवार पेठेत एका पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या खुनाने पोलिसांची झोप उडाली असताना त्याच परिसरात एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा अज्ञाताने खून केला आहे. या दोन्ही घटना काही तासांत घडल्या आहेत. यामुळे शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ […]
आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी व्यापाऱ्याला घातला गंडा!
नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन मिरची व्यापाऱ्याला साडे चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना नागपूर एमआयडीसीतील जयताळा भागात घडली. मिरची व्यापारी सुभाष नत्थुजी वाघमारे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
‘तुमच्याकडे फक्त चारच दिवस शिल्लक, काय करायचंय ते करुन घ्या
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून देण्यात आली आहे. पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला.यापूर्वी ही योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरुन मेसेज आला आहे […]
बोपदेव घाटात नेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड; पती अटकेत
पुणे – पत्नीने ती काम करत असलेली जागा न दाखवल्याने पतीने तीला बोपदेव घाटात नेत चेहऱ्यावर ऍसिड टाकले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती दिनेश शिरपत धुमक(39,रा.बावधान गाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनेश त्याच्या 37 वर्षीय पत्नीवर नेहमी संशय घेत होता. तो पेटींगचे काम करतो तर पत्नी धुण्या भांड्याची कामे करते. घटनेच्या दिवशी पती तीला […]
सरकारमान्य धान्य रेशनिंग दुकानात अवैध “दारूविक्री”
सातारा | कोरेगांव तालुक्यातील चिमगणगाव येथे एका सरकारमान्य रास्त भाव धान्य रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिमणगांव येथील एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची […]
बांधकामाच्या वाळुच्या वादातून मध्यस्थी करणार्या तरुणाची निर्घुण हत्या
अमरावती : बांधकामासाठी लागणार्या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून 26 जणांच्या विरोधात पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार 27 मार्च […]











