पुणे – पाच वर्षांपासून तडीपार असलेल्या गुंडाने बुधवार पेठेत एका पोलीस हवालदाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या खुनाने पोलिसांची झोप उडाली असताना त्याच परिसरात एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा अज्ञाताने खून केला आहे. या दोन्ही घटना काही तासांत घडल्या आहेत.
यामुळे शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे. घटनास्थळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. पोलीस हवालदार समीर सय्यद (वय 48) असे खून झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजन याने हा खून केला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या राणी (वय 24) नावाच्या महिलेचा खून झाला आहे.