गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सरकारमान्य धान्य रेशनिंग दुकानात अवैध “दारूविक्री”

सातारा | कोरेगांव तालुक्यातील चिमगणगाव येथे एका सरकारमान्य रास्त भाव धान्य रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिमणगांव येथील एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने दि. 28 रोजी चिमणगांव हद्दीतील सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात जावून पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखालील पथकाने अचानक छापा टाकला. दुकानामध्ये व दुकान मालकाच्या स्कार्पिओ जीप (एमएच. 11 बी. व्ही. 3553) मध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व इतर असा एकुण 7 लाख 08 हजार 576 रुपयांचा प्रोव्हीबिशन माल मिळून आला. संशयिताने जिल्हाधिकारी सातारा यांचे कोवीड-19 अनुषंगाने लागू असलेल्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्या गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनांनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, पो. कॉ. विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *