नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन मिरची व्यापाऱ्याला साडे चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना नागपूर एमआयडीसीतील जयताळा भागात घडली. मिरची व्यापारी सुभाष नत्थुजी वाघमारे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
