ट्रिपल सीट जाताना सापडल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तब्बल साडेसात हजार रुपयांचा दंड भरायला सांगितल्याने सैरभैर झालेल्या व वस्तुस्थिती सांगितल्यानंतरही गाडी सोडली जात नसल्याने वैतागलेल्या तरुणाने भरदुपारी भररस्त्यात अंगावर डिझेल ओतून घेतल्याची धक्कादायक घटना सातारा बसस्थानकानजीक घडली. सातारा बसस्थानक ते पोवई नाका या रस्त्यावरून तिघेजण एका दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी बसस्थानकाशेजारी सेव्हन स्टार कॉम्प्लेक्ससमोर कर्तव्य बजावत असलेले […]
गुन्हे विश्व
भूताची भीती दाखवून साडेआठ लाखांचे दागिने लांबवले
घरात आत्म्याचा वावर आहे. वेळीच हवन आणि पूजा न केल्यास घरात वाईट घटना घडेल अशा भूलथापा मारून भोंदूबाबाने महिलेचे साडेआठ लाख रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन जणांविरोधात फसवणुकीसह अंधश्रद्धा, अधोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पळून गेलेल्या त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार […]
जन्मदात्या आईनेच केली पाच महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या
जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील तरडगाव येथे घडली आहे. या आईला लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांढरी तरडगाव येथे आरती सोमनाथ गायकवाड ही महिला राहते. या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करून […]
संपत्तीच्या वादातून काकांनी पुतण्याला भररस्त्यात संपवलं; चाकूनं भोसकून हत्या
उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं भररस्त्यात एका युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं उघड झाले आहे. काकाने मालमत्तेच्या वादातून पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला. पुतण्याच्या मृत्यूपर्यंत निर्दयीपणे चाकूने भोसकण्यात आले. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडत होता. मात्र युवकाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. गुन्हेगारांना रोखण्याची कुणालाही हिंमत झाली नाही. ही सर्व घटना […]
माझा मृत्यू हेच तुझ्या लग्नाचे गिफ्ट, प्रेयसीला मेसेज करत तरुणाची आत्महत्या
छत्तीसगढमधील बालोड जिल्ह्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या प्रेयसीचे दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न होत असल्याने तो निराश झाला होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली आहे. सागर ( नाव बदलले आहे) याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्या तरुणीच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी त्या तरुणीचे लग्न दुसऱ्यासोबत ठरवले होते. मुलीच्या […]
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ‘पीए’वर गोळीबार, राजकीय कारण असल्याचा आरोप
जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे खासगी स्वीय्य सहायक राहुल राजळे यांच्यावर काल रात्री नेवासा तालुक्यात हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील दोन राजळे यांना लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला राजकीय कारणातून झाल्याचा संशय व्यक्त होत असून हल्लेखोर घोडेगाव (ता. नेवासा) परीसरातील असल्याचे सांगण्यात आले. विकास जनार्धन राजळे […]
पाच कोटी द्या, अन्यथा तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार करेन; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस […]
प्रेयसीसाठी बायकोचा गळा चिरला, गर्लफ्रेंडसह 3 मुलांचा बाप अटकेत
बिहारच्या कैमूरमध्ये एका व्यक्तीने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून पळ काढला. घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून पुढील प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली.पोलिसांनी हत्येच्या अवघ्या 36 तासांमध्ये आरोपी व त्याच्या प्रेयसीला अटक करून गुन्ह्याची उकल करण्यात आली. आपल्या अवैध संबंधाना पत्नीचा विरोध असल्याकारणाने मी तिची हत्या केली, असे आरोपीने पोलिसांसमोर कबूल केले. मोहनिया […]
अज्ञाताने अडीच एकर टरबुजावर फवारले तणनाशक, शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास हिरावला
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. टरबुजाच्या शेतीवर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याची घटना घडली आहे. त्यामुळं सगळी टरबूजाच्या वेली जळून गेल्या आहेत. शेतकऱ्याचे उभे पीक वाया गेले आहे. सुनील रामहरी गायकवाड असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. टरबूज शेतीवर तणनाशक फवारल्याने सुनिल गायकवाड यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सुनील यांनी […]
बाईकचा हप्ता भरला नाही म्हणून शेतकऱ्याची गोळ्या झाडून हत्या
बाईकचा हप्ता भरला नाही म्हणून वसुली एजंटने शेतकऱ्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूर येथे हि घटना घडली आहे. संदीप मांड (25) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भर वर्दळीच्या रस्त्यात घडली. गोळीबार करण्यापूर्वी या वसुली एजंटने संदीप यांची बाईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. […]











