गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भूताची भीती दाखवून साडेआठ लाखांचे दागिने लांबवले

घरात आत्म्याचा वावर आहे. वेळीच हवन आणि पूजा न केल्यास घरात वाईट घटना घडेल अशा भूलथापा मारून भोंदूबाबाने महिलेचे साडेआठ लाख रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन जणांविरोधात फसवणुकीसह अंधश्रद्धा, अधोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पळून गेलेल्या त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार या बोरिवली येथे राहत असून त्यांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. त्यांना एका आजाराची लागण झाली असल्याने त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले होते. तरीदेखील त्यांचा आजार बरा होत नव्हता. महिलेला रात्री-अपरात्री विचित्र स्वप्नं पडत असल्याने त्या मानसिक तणावात होत्या. त्यातच घरात कौटुंबिक समस्या वाढत असल्याने त्यातून त्यांना मार्ग काढायचा होता. मार्ग काढण्यासाठी त्यांनी पतीसोबत चर्चा केली. त्यानंतर एका वेबसाईटच्या माध्यमातून भोंदूबाबाचा नंबर शोधून काढला. त्या नंबरवर महिलेने पह्न करून घरातील काwटुंबिक समस्येची माहिती सांगितली.

काही दिवसांपूर्वी भोंदूबाबाचा एक सहकारी हा महिलेच्या घरी आला. त्याने घरी आल्यावर पूजेच्या नावाखाली सुरुवातीला पाच हजार रुपये घेतले. काम झाल्यावर पुन्हा एक लाख रुपये द्यावे असे त्याने महिलेला सांगितले. महिलेने होकार देताच त्या भोंदूबाबाने घरात भूतप्रेताचा वावर आहे. कोणी तरी जादूटोणा केला आहे. त्यामुळे घरात समस्या निर्माण झाली असल्याच्या भूलथापा मारल्या. भोंदूबाबाच्या सहकाऱयाने महिलेच्या घरी पूजा केली. पूजा करूनदेखील काहीच फरक पडला नव्हता. तो भोंदूबाबा हा महिलेकडे आणखी पैशांची मागणी करत होता. अखेर महिलेने दुसऱया भोंदूबाबाला पह्न करून पूजेसाठी घरी येण्यास सांगितले.

दोन वर्षांपूर्वी एक भोंदूबाबा हा महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला तिच्या पती आणि मुलाच्या जिवाला धोका असल्याचे सांगून त्यांना बाहेर काढले. पूजेच्या नावाखाली साडेआठ लाखांचे दागिने एका रुमालात बांधण्यास सांगितले. त्या दागिन्यांच्या रुमालावर लिंबू फिरवून महिलेला पाण्याची बाटली दिली. त्या बाटलीतील पाणी रोज थोडे थोडे प्यावे असे महिलेला सांगून तो दागिन्यांचा रुमाल एका पेटीत ठेवून ती पेटी किमान पाच वर्षे उघडू नका.

पेटी उघडल्यास पतीचा नाही तर महिलेचा मृत्यू होईल अशी भीती दाखवली. भीतीपोटी महिलेने ती पेटी उघडली नाही. गेल्या वर्षी महिलेने ती पेटी उघडली तेव्हा त्यात दागिने नसल्याचे महिलेच्या लक्षात आले. फसवणूकप्रकरणी महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *