गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अज्ञाताने अडीच एकर टरबुजावर फवारले तणनाशक, शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास हिरावला

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. टरबुजाच्या शेतीवर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याची घटना घडली आहे.

त्यामुळं सगळी टरबूजाच्या वेली जळून गेल्या आहेत. शेतकऱ्याचे उभे पीक वाया गेले आहे. सुनील रामहरी गायकवाड असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. टरबूज शेतीवर तणनाशक फवारल्याने सुनिल गायकवाड यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सुनील यांनी अडीच एकर शेतावर महाग असणारे टरबुजाचे बियाणं लावले होते. त्याची योग्य ती देखभाल देखील केली होती. त्याला फळही चांगले लागले होते. मात्र, रात्री अज्ञात व्यक्तीने त्यावर तणनाशक फवारले.

त्यामुळं सगळी टरबूज वाया गेली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेतकरी सुनील रामहरी गायकवाड यांनी वीरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता, त्यामुळे रब्बी हंगामात मी टरबुजाची लागवड केली होती. रमजान महिन्यात टरबूज तोडणीला आली होती. या टरबूज शेतीमधून चार ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. परंतू, नवनाथ गायकवाड आणि अभिषेक गायकवाड यांनी माझ्या शेतावर तणनाशक फवारुन नुकसान केले असल्याचे शेतकरी सुनील गायकवाड यांनी सांगितले.

याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला गेलो असता त्यांनी एनसीआरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीला अटक केली नाही. दुसरी काहीही कारवाई केली नसल्याचे सुनिल यांनी सांगितले. माझे अतोनात नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई कोण देईल. माझ्याकडे बँकेचे कर्ज आहे, त्याची परतफेड कशी करावी की आत्महत्या करावी असा उद्विग्न सवाल शेतकरी सुनिल यांनी उपस्थित केला आहे. किटकनाशकांच्या फवारनीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सुनिल गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *