गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बाईकचा हप्ता भरला नाही म्हणून शेतकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

बाईकचा हप्ता भरला नाही म्हणून वसुली एजंटने शेतकऱ्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूर येथे हि घटना घडली आहे. संदीप मांड (25) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भर वर्दळीच्या रस्त्यात घडली. गोळीबार करण्यापूर्वी या वसुली एजंटने संदीप यांची बाईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु संदीप यांनी आरोपीला आपली बाईक दिली नाही. यावेळी आरोपीने संदीप यांच्यावर गोळ्या झाडून तेथून पळ काढला. यात संदीप यांचा मृत्यू झाला.

रामपूरचे एसपी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, शेतकरी संदीप मांड हे आई चरणजीतसोबत आपल्या बाईक वरून रुद्रपूरला जात होते. यावेळी ‘यादव ब्रदर्स’च्या वसुली एजंटनी त्यांना रुद्रपूर बिलासपूर सीमेवर आडवले. यावेळी संदीप व एजंट दरम्यान बाईकचा हप्ता न भरल्याच्या कारणावरून वादावादी झाली. एजंटनी त्यांच्याकडून बाईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र बाईक त्यांच्या हाती न लागल्याने त्यांनी रागाच्या भरात संदीप यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या.

हि घटना घडल्यानंतर संदीप यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संदीप यांच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलराज सिंह, रामप्रकाश यादव, लल्ला यादव, प्रिन्स यादव आणि विपिन यादव या पाच जणांविरुद्ध IPCM कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *