प्रियकराने विवाहित प्रेयसीवर कटरने वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडातील सेक्टर ६३ कोतवाली भागातील छिजारसी कॉलनीमध्ये असलेल्या ओयोच्या लॉजमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास महिलेची हत्या करून आरोपी हॉटेलमधून फरार झाला. बराच वेळ रुममधून कुठलाही प्रतिसाद न आल्याने कर्मचाऱ्याने दरवाजा तोडला. बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह पाहून हॉटेल कर्मचाऱ्याने […]
ताज्याघडामोडी
दोन वर्षांपूर्वी झालेल्या लव्ह मॅरेजचा हृदयद्रावक अंत, सकाळी पतीशी भांडण, सायंकाळी पत्नीने..
राजस्थानमधील जोधपूर येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. राजीव गांधी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी या महिलेचे पतीसोबत भांडण झाले आणि सायंकाळी उशिरा तिचा मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. राजीव गांधी नगर भागातील पठाणकोट भागात राहणाऱ्या महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आता ती संशयास्पद परिस्थितीत […]
तरुणीच्या मदतीने बनवले हनीट्रॅप, खंडणीही उकळली अन् ‘तिच्यावरच’ केला बलात्कार
तरुणीची मदत घेऊन अनेक व्यावसायिकांना बलात्काराच्या खोट्या केसमध्ये फसविण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या वकिलाविरुद्ध त्याच तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. पर व्यक्तीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करायला लावून, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपी मध्ये Adv. विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय […]
जिथे काम करायचे तिथेच घात, क्षुल्लक कारणावरुन वाद, पोटच्या मुलाकडून बेदम मारहाण; बापाची हत्या
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जवळच असलेल्या घाटपळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारामधील हरिभाऊ दयाराम तायडे यांच्या वीट भट्टीवरील पिता-पुत्रांमध्ये घरगुती वादावरून शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रूपांतर मारामारीत झालं. मुलगा भाऊ सिंग भैरड्या (वय ४०) याने त्याचे वडिल नानसिंग पहाडसिंग भैरड्या (वय […]
चंदन मध्यरात्री घराबाहेर पडला तो अखेरचा, सकाळी पडक्या घरात सापडला, दोरी दिसल्यानं गूढ वाढलं
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये दोरीने गळा आवळून १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही थरारक घटना रविवारी सकाळी कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील गुलमोहरनगर येथे उघडकीस आली. या घटनेने पोलीस व रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. चंदन कन्हय्या लहरे,असे मृत मुलाचं नाव आहे. तो टाइल्स फिटिंगचे काम करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला
नवी मुंबई शहरामध्ये गुन्हेगारीचे क्षेत्र वाढत चालले आहे. नेरुळमध्ये बांधकाम व्यवसायिकाची हत्या त्यानंतर पनवेलमध्ये बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर गोळीबार असे एक ना अनेक प्रकार सर्रासपणे घडत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे. त्यातच आता जीभेचे चोचले पुरविण्याच्या नादात २९ मार्चला रात्रीच्या वेळी […]
ड्युटीवर निघाली पण पोहोचलीच नाही, २६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू
बुलढाणा येथील नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता झाली. प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. परंतु सत्य समोर आल्यावर कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. ही दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे घडली. पूर्णिमा दिनकर इंगळे (वय वर्ष २६) असे मृत तरुणीचे नाव […]
आई आता मी कसं जगू, माझं कसं होणार, लेक हंबरडा फोडत कोसळताच सर्व संपलं, आईच्या पार्थिवावर मुलीनं प्राण सोडला
जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे शुक्रवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचं निधन झाल्यानं माहेरी आलेल्या लेकीनं आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडले. एकाच घरात एकाच दिवशी दोन जणांचं निधन झाल्यानं शेवाळकर आणि जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जयमाला जाधव या त्यांच्या आई गयाबाई शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळताच माहेरी आल्या होत्या. आईच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडत […]
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा; सिलिंडर दरात मोठी घट; पाहा नवे दर
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्याच दिवशी लोकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेच बदल झालेले नाहीत. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात केंद्रानं घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली होती. या महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. पण व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर कमी […]
ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला
शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर उलटल्याने तरुण ट्रॅक्टर खाली अडकला गेला. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने रणदिवे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. भूषण विजय […]