गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीच्या मदतीने बनवले हनीट्रॅप, खंडणीही उकळली अन् ‘तिच्यावरच’ केला बलात्कार

तरुणीची मदत घेऊन अनेक व्यावसायिकांना बलात्काराच्या खोट्या केसमध्ये फसविण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या वकिलाविरुद्ध त्याच तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. पर व्यक्तीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करायला लावून, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केलेल्या आरोपी मध्ये Adv. विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३४) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी वकिलाने काही व्यावसायिकांना हनी ट्रॅपमध्ये फसवून बलात्काराची केस करण्याची धमकी देत त्यांच्याकडून 17 लाखांची खंडणी वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उद्योजकाच्या मैत्रिणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जून 2021 ते 25 जानेवारी 2023 दरम्यान वाघोलीत हा प्रकार हा घडला.

पोलिसांचा माहितीनुसार फिर्यादी हिची वैभव शिंदे, Adv. विक्रम भाटे यांच्याशी ओळखी आहे. ते दोघे फिर्यादीच्या घरी आले. कोल्ड्रींकमध्ये घातक पदार्थ मिसळून तिला पिण्यास आग्रह केला. यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी शारीरिक संबंध केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रिकरणही केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसऱ्या व्यक्तींबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपींनी या प्रसंगाचे चित्रिकरण करून त्या व्यावसायिकांनाही लुबाडले. हडपसरमधील व्यापाराला असेच फिर्यादीला हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास सांगितले होते. मात्र तो मित्र असल्याने तसे करण्यास फिर्यादीने नकार दिला.

नंतर भाटे यांनी दुसऱ्या एका तरुणीला मदत करायला सांगितले आणि फिर्यादीच्या मदतीने त्या दुसऱ्या तरुणीला या व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून सतरा लाखाची खंडणी वसूल केली. तेव्हा मित्रच फसला आहे, म्हणून तक्रारदाराने मी आणि ॲड. भाटे व आम्ही सर्व जणांनी अशा प्रकारे लुबाडणूक करत असल्याची कबुली दिली. नंतर व्यापाऱ्याने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानंतर या तरुणीनेसुद्धा तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. आरोपी भाटे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *