ताज्याघडामोडी

ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला

शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर उलटल्याने तरुण ट्रॅक्टर खाली अडकला गेला. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने रणदिवे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

भूषण विजय रणदिवे ( वय ३१ वर्षे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मृत तरुणाचा चुलत भाऊ आशुतोष दत्तात्रय रणदिवे याने न्हावरे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव सांडस येथे रणदिवे यांचे शेत आहे. बाप लेक शेतातील कांद्याचे पीक काढून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन घरी येते होते. घरी जात असताना शेतकरी तानाजी भंडलकर यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला. त्यात रस्ता उताराचा असल्याने त्यात ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून सुसाट झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला.

ट्रॅक्टर उलटल्याने तरुण त्या ट्रॉली खाली अडकला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घरातील तरुण मुलगा गेल्याने रणदिवे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *