लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या 4 जागांसाठी 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यात पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा जागेचा समावेश आहे. ही जागा बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झाली आहे. गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी आपल्या लोकसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. […]
ताज्याघडामोडी
झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करताना मुलीने पाहिलं, बापाने तिलाही संपवलं
पत्नी आणि मुलीची हत्या करत कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सरोदी मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. विलास चंपतराव गवते असं या व्यक्तीचं नाव आहे. विलास गवते यांचा दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांच्याकडे १० दुभती जनावरं होती आणि दुधाचा व्यवसायही […]
भाच्याचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मामाचा खून
भाच्याचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मामाचा खून झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अनिल रामचंद्र बारड असं या मृत माणसाचं नाव आहे. कोल्हापूर येथील धामोड व बुरंबाळी (ता.राधानगरी) दरम्यानच्या हॉटेल निसर्गमध्ये जेवल्यानंतर तंबाखु खाण्यासाठी चुना मागण्यावरून विकास नाथाजी कुंभार (रा. कुंभारवाडी) याची व जितेंद्र केरबा खामकर (रा. खामकरवाडी) या दोघांची हॉटेलमध्ये वादावादी झाली. हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र […]
ज्या दिवशी प्रमोशन त्याच दिवशी पडल्या बेड्या
बीडमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाला त्याच्या पदोन्नतीच्या दिवशीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांना 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. पदोन्नतीची झालेल्या दिवशीच मित्रपरिवारांकडून सत्कार झाला, पेढेही खाल्ले, पण लाच मागणी केल्यामुळे सायंकाळी त्यांच्या हाती बेड्या पडल्या. त्यामुळे पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला. […]
आता पोलीसच चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी, गृहमंत्रालयाचा निर्णय
कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना बजावली होती. मात्र, यानिमित्ताने फडणवीसांच्या समर्थनार्थ उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचं भाजपनं ठरवले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार चिन्हे आहेत. मात्र, पोलीस फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयाने याबाबत तसा निर्णय घेतला आहे. फडणवीस […]
एक वर्षाच्या चिमुकलीला बापाने जिवंत पुरले, घटना वाचून थरकाप उडेल
एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.रिसोड तालुक्यातील एका निर्दयी बापाने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सुरेश प्रभाकर घुगे वय २७ वर्ष असं निर्दयी […]
ओबीसी आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्यपालांची अखेर विधेयकावर स्वाक्षरी
ओबीसी आरक्षणाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा न्यायप्रविष्ट असला तरी तो सोडवण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकराने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतंच एक विधेयक मंजूर केलं होतं. या विधेयकाला प्रभार रचना विधेयक असं म्हटलं जात होतं. या विधेयकाचा संबंध […]
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग
आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडत आहे. या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चार राज्यातील विजयानंतर ईडीच्या कारवाईंवरून इशारा दिला होता. काही लोक ईडीच्या कारवाईंना धार्मिक रंग देत आहेत. मात्र मी […]
Maharashtra Budget 2022: आज ‘महा अर्थसंकल्प
उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १,१६० कोटींच्या निधीची तरतूद शालेय शिक्षण विभागासाठी २,३५४ कोटींच्या निधीची तरतूद आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार ८ कोटींची तरतूद हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन […]
पंढरपूर सिंहगड मध्ये “ताण तणाव व्यवस्थापन” याविषयावर व्याख्यान
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथे गुरुवार दिनांक १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने “महिलांचे ताण-तणाव व्यवस्थापन” याविषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन सहभागी झालेल्या डॉ. […]











