

बीडमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाला त्याच्या पदोन्नतीच्या दिवशीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांना 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. पदोन्नतीची झालेल्या दिवशीच मित्रपरिवारांकडून सत्कार झाला, पेढेही खाल्ले, पण लाच मागणी केल्यामुळे सायंकाळी त्यांच्या हाती बेड्या पडल्या. त्यामुळे पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला. अफरोज तैमूर खॉ पठाण असे त्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते पाटोदा ठाण्यात कार्यरत होते.
तपासात सहकार्य करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर 40 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र, संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी लाच स्वीकारली नाही. याप्रकरणी अखेर एसीबीने त्यांना लाचमागणीच्या आरोपाखाली अटक केली.