ताज्याघडामोडी

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत शरद पवारांचं महत्वाचं भाष्य

प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी जुन्या पेन्शन योजना बाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले की, सध्या राज्यात फिरत असताना मला सातत्यानं एक निवेदन मिळत असतं की जुनी पेन्शन लागू करा. संभाजी थोरात मला म्हणाले की जुनी पेन्शन लागू केली तर याचा परिणाम 30 वर्षानंतर दिसेल कारण. आता जे निवृत्त होत […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारमध्ये रहायचं की नाही ते 5 तारखेला ठरवू : राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे. हे सरकार जुलमी सरकार आहे. शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश आलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असं राजू शेट्टी म्हणाले. तर, येणाऱ्या 5 तारखेला राज्यसरकार मध्ये राहायचे का ते कार्यकारणी मेळाव्यात […]

ताज्याघडामोडी

निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी बायकोला विकले? महिलेची पोलिसांत तक्रार

उत्तर प्रदेशात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पोलीस स्टेशनमध्ये ढसाढसा रडणाऱ्या उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लाखों रुपये देऊनही पक्षाने तिकीट न दिल्याने हा उमेदवार रडत होता. त्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आता या उमेदवाराची बायको पोलीस ठाण्यात पोहोचली असून तिने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत तिकीट मिळावं […]

ताज्याघडामोडी

देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य

नागपुरात गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस गोव्याच्या निकालानंतर पहिल्यांदाच नागपुरात येत असल्यामुळे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. […]

ताज्याघडामोडी

‘पेपर फुटला तर शाळेची मान्यताच रद्द’, राज्य सरकारचा कडक निर्णय!

अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. इथून पुढे ज्या शाळेत पेपर फुटीच प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल’ अशी घोषणाच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसंच, एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत, असंही वर्षा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

११ वर्षीय मुलावर अत्याचार, खळबळजनक घटना समोर

राज्यामध्ये महिलांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत असताना परभणी शहरातील दर्गा रोड येथे रुग्णालयात घेऊन जाण्याच्या बहाण्याने बळजबरीने एका ११ वर्षीय मुलाला सोबत घेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना परभणी शहरात उघडकीस आलीय. रविवारी (१३ मार्च) रोजी दुपारी सदर प्रकरणी आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

किरकोळ वादातून वकिलावर प्राणघातक हल्ला, साताऱ्यात सहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा येथील वकील राममोहन खारकर (वय 37) यांच्यावर शाहूनगर चौकात रात्री साडेदहा वाजता सहाजणांनी गाडी अडवून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्र्ाक्रिया करण्यात आली आहे. साताऱयातील शाहूनगर येथे वास्तव्यास असलेले व सध्या अंबाजोगाई येथे न्यायाधीश असलेले चंद्रमोहन खारकर यांचे ते मोठे बंधू आहेत. रस्त्यातून बाजूला थांबा असे सांगितल्याच्या कारणातून हा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला

वर्गात घुसून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला. पुण्याच्या वडगाव शेरी हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीवर सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रक चालकाची पोलिसांनी केली गाडी जप्त, चालकाने स्वत:ला पेटवून घेतले

तामिळनाडूच्या सेलममध्ये एक विचीत्र घटना समोर आली आहे. एका दारूड्या ट्रक चालकाकडून पोलिसांनी गाडी जप्त केल्याने त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याची हालत गंभीर आहे. संतोष कुमार असे त्या ट्रक चालकाचे नाव असून तो अरसमराथु करत्तूर येथील रहिवासी आहे. तो ट्रक चालक म्हणून काम करतो. तामिळनाडू […]

ताज्याघडामोडी

फडणवीसांनी टाकला आणखी एक खळबळजनक पेनड्राइव्ह बॉम्ब; कुणाचे आहेत दाऊदशी संबंध?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीसांनी हा पेन ड्राइव्ह आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची माणसं मुस्लीम वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर आला आहे. पुढे ते […]