ताज्याघडामोडी

‘पेपर फुटला तर शाळेची मान्यताच रद्द’, राज्य सरकारचा कडक निर्णय!

अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे.

इथून पुढे ज्या शाळेत पेपर फुटीच प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल’ अशी घोषणाच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसंच, एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत, असंही वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. पण, नगरमध्ये पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कडक पाऊल उचलले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. इथून पुढे ज्या शाळेत पेपर फुटीच प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल आणि एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत, अशी घोषणाच गायकवाड यांनी विधान परिषदेत केली आहे.

यासोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर पोहोचावे. सकाळी साडेदहा चा पेपर असल्यास 9:30 वाजता तर दुपारी तीन वाजता पेपर असल्यास दोनला पोहोचावे. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाईल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

‘परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण पसरू नये दहावीचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या आणि देशाचे भवितव्य आहेत त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असंही वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *