देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जात आहे. तर तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधन शहरात एका गटाने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. […]
ताज्याघडामोडी
“द काश्मीर फाईल्स”पाहून येणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला!!
सध्या देशात “द काश्मीर फाईल्स” या या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू असताना पश्चिम बंगालमधील नदिया येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राणाघाटमधील भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आपण “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट पाहून परतत होतो, त्यावेळी आपल्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी सांगितले. […]
महाराष्ट्राच्या नादाला लागल्यावर काय होतं हे दिल्लीश्वरांना कळू द्या, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या माध्यमातून भाजपचा सुरू असलेला छूपा प्रचार, ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफरच्या माध्यमातून शिवसेनेला मुस्लिम धार्जिणे ठरविण्याचा भाजपचा डाव याचा समाचार घेत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा हिजाब उतरवला. कश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा तिथे भाजपने पाठिंबा दिलेल्या पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचेच सरकार होते. आता जो मायेचा […]
आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीवर मुलांचा कोणताही अधिकार नाही
आई-वडिलांच्या संपत्ती प्रकरणी सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांचा त्यांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एका महिलेने आपल्या पतीची संपत्ती विकण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पतीच्या संपत्तीचे कायदेशील पालकत्व (मालकी) मिळावी यासाठी सोनिया खान यांनी […]
वृद्धाने पेटवून दिलं घर; आगीत जळून मुलगा, सून अन् 2 नातवंडांचा मृत्यू
केरळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील मालमत्तेच्या वादातून एका वृद्धाने इडुक्की भागात आपला मुलगा आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांना पेटवून दिलं. माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ही घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेनंतर 79 वर्षीय आरोपी हमीदला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितलं की, या घटनेत घरात झोपलेला […]
सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
सासरच्या छळाला कंटाळून उरळीकांचन येथिल एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यासंदर्भात त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी ( दि.१८) गुन्हा दाखल केला. उरळीकांचनमधील खेडेकर मळा भागात २४ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. राहुल विलास खेडेकर ( वय ३२, रा. खेडेकर मळा ) हे मृताचे नाव आहे. राहुल व त्याच्या सासरच्या मंडळींची किरकोळ कारणावरून […]
डीजेवर नाचता नाचता तरुणानं स्वतःच्याच छातीत खुपसला चाकू
मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तर बाणगंगा परिसरात होळीच्या कार्यक्रमात नाचत असताना एका तरुणाने स्वतःच्या छातीवर चाकूनं वार केले. यावेळी उपस्थित लोकांनी त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या […]
संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच खुपसली कात्री
टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेनं पुणे हादरुन गेलंय. या घटनेत संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच शिवण कामासाठी वापरली जाणारा कात्री खुपसली आहे. यात ग्राहक जखमी झाली आहे. शहरातील चंदननगर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . टेलरिंगच्या दुकानात कपडे अल्टर करण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या पोटात कात्री खुपसली आहे. ही घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या […]
सोसायटीच्या धुलिवंदनात खूप नाचला,घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू
धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असतांना बदलापूर मात्र एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आशुतोष संसारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आशुतोष पत्नीसह बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात गेल्या काही वर्षांपासून राहत होता. आशुतोष ज्या शुभदन सोसायटीमध्ये राहत होता. या सोसायटीमध्ये होळी आणि धुलिवंदन सणाच्या निमित्ताने स्पीकरवर गाणी लावून सोसायटीतील सगळे रहिवाशी नाचत होते. […]
जप्त झालेली वाहनं तात्काळ सोडवा, अन्यथा लवकरच लिलावात निघणार
महानगर क्षेत्रात रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत सोडून दिलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. पर्यायाने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने धडाक्यात सुरु केली आहे. मागील आठवडाभरात एकूण 2 हजार 381 वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर 379 जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर 782 बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. कोविड […]











