गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तेलंगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटात राडा

देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जात आहे. तर तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधन शहरात एका गटाने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. पण या पुतळ्याला दुसऱ्या एका गटाने विरोध केला. यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर या गटाने जोरदार गोंधळ घातला आणि दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा मारा केला. या धुमश्चक्रीमध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहे.

निजामाबाद पोलीस आयुक्त नागराजू यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कलम 144 लागू केला आहे. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला. या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते धर्मपुरी अरविंद यांनी ट्वीट करून बोधन जिल्हा परिषदेनं शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यास परवानगी दिली होती. पण तरीही टीआरएस-एमआएएमच्या गुंडांची गोंधळ घातला. आता सत्ताधआरी टीआरएसच्या नेत्यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून खुलेआम धमकी देत आहे, असा आरोपही त्यांनी केली.

दरम्यान, तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी फोनवर पोलीस महासंचालक एम महेंद्र रेड्डी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या शहरात परिस्थिती नियमंत्रणात आहे. शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *