ताज्याघडामोडी

सोसायटीच्या धुलिवंदनात खूप नाचला,घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू

धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असतांना बदलापूर मात्र एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आशुतोष संसारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आशुतोष पत्नीसह बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात गेल्या काही वर्षांपासून राहत होता. आशुतोष ज्या शुभदन सोसायटीमध्ये राहत होता. या सोसायटीमध्ये होळी आणि धुलिवंदन सणाच्या निमित्ताने स्पीकरवर गाणी लावून सोसायटीतील सगळे रहिवाशी नाचत होते. आशुतोष देखील या सगळ्यां सोबत नाचत या सणाचा मनमुराद आनंद लुटत होता.

मात्र दुपारच्या सुमारास आशुतोष नाचून घरी गेला आणि थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. आशुतोषच्या मृत्यूने परिवाराला मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. बदलापूर पश्चिमेच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदन ही सोसायटी असून इथे होळी निमित्त संगीताचा तालावर दुपारी सगळे नाचत होते. आशुतोष देखील नाचत होता.

नाचून झाल्यावर तो घरी गेला आणि त्याचा छातीत दुखू लागले. हे ही धुळवडीसाठी आजीच्या घरी आला होता चिमुरडा; मामाने फिरायला बाहेर नेलं, अन्… त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती देताच त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.

एक वर्षांपूर्वीच आशुतोषचे लग्न झाले होते. त्यामुळे आशुतोषच्या मृत्यूने त्याच्या पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मात्र आशुतोषचा मृत्यू हृदय विकाराचा झटका आल्याने झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आशुतोषचे शव शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान होळी सणाच्या दिवशी बदलापूर शहरात एक आत्महत्या आणि आशुतोषचा मृत्यू या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे सणाच्या दिवशी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *