विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचे संबंध थेट गँगस्टर दाउद इब्राहिमच्या साथीदारांशी असल्याचे विधानसभेतच उलगडून दाखविल्यानंतर पुणे पोलिसांत खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याची गोपनीय कागदपत्रे फडणवीस यांच्या हातात कशी पोहोचली, याची चौकशी सुरू झाली असून, पुणे पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. कोथरूड पोलिस ठाण्यातील […]
ताज्याघडामोडी
धक्कादायक! तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून विवाहितेचा खून, ६ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
लग्नानंतर एक महिना सासरी नांदवल्यानंतर छोट्या-मोठ्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. यातूनच तिला घराच्या तिसर्या मजल्यावरून ढकलून देत ठार मारलं. ही घटना बीड शहरातील शाहुनगर भागातील उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने सासरच्या लोकांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून सासरी पाठवलेल्या […]
रिक्षातून पडून ११ वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; एकुलत्या एक मुलीला गमावल्याने वडिलांना दु:ख अनावर
धावत्या रिक्षातून तोल जाऊन खाली पडलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने प्रवास करत होती. मात्र हाच प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला असल्याचं या घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न. […]
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना डीटीएच चॅनेलद्वारे शिक्षण, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
दिव्यांग तसेच गतिमंद विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत आहे. पहिली ते बारावीत शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. या मुलांना 12 डीटीएच चॅनेलमार्फत शिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा दिव्यांग, गतिमंद विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य मुलांनाही होणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. दिव्यांग […]
मला कोल्हापूरातील रुग्णालयातच ठार मारण्याचा कट आखला होता : नितेश राणे
संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना मला ठार मारण्याचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना अटक झाली होती. त्यावेळी सावंतवाडी कारागृहात असताना नितेश राणे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर सुरुवातीला कणकवली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या […]
लक्षवेधी लावत नसल्यामुळे विधानसभेत आमदार सुनील शेळके रडले!
आपण कायम लोकप्रतिनिधी भावूक झाल्याची काही उदाहरणे पाहत असतो. काही नेतेमंडळी अनेकदा जाहीर मंचावरुन रडल्याचे देखील आपण पाहिले आहे. पण आता एका आमदाराला विधिमंडळात अक्षरक्ष: रडायची वेळ आली आहे. ही वेळ राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर आली आहे. कालपासून आपली लक्षवेधी लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. […]
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला परमबीर सिंह प्रकरणी झटका
परमबीर सिंहावर दाखल असलेली सर्व प्रकरणे आता राज्य सरकारकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सीबीआयला एका आठवड्याच्या आत ही सर्व माहिती द्या असा, आदेश दिला आहे. महाराष्ट्रातील राजकारण परमबीर सिंह यांच्यावरील आरोपमुळे संपूर्ण ढवळून गेले आहे. परमबीर सिंह प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होणे अपेक्षित असून सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला […]
पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात व्याख्यान संपन्न
एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ रोजी “क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स अँड पेटेन्ट फायलिंग” याविषयावर डाॅ. भालचंद्र केळकर व डाॅ. सुहासराव खांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. या व्याख्यानाचे […]
“…नाहीतर आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू, शिवसेनेवर बहिष्कार टाकू”; ब्राह्मण समाजाचा इशारा
शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे. “शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे. काल म्हणजेच मंगळवारी (२२ मार्च २०२२ रोजी) औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत […]
‘मुळशी पॅटर्न’ची थराराक घटना, तरुणावर कोयत्याने सपासप वार करून संपवलं
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) […]











