गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अज्ञाताने अडीच एकर टरबुजावर फवारले तणनाशक, शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास हिरावला

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. टरबुजाच्या शेतीवर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याची घटना घडली आहे. त्यामुळं सगळी टरबूजाच्या वेली जळून गेल्या आहेत. शेतकऱ्याचे उभे पीक वाया गेले आहे. सुनील रामहरी गायकवाड असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. टरबूज शेतीवर तणनाशक फवारल्याने सुनिल गायकवाड यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सुनील यांनी […]

ताज्याघडामोडी

कानात हेडफोन घालून भिंतीवर बसणे तरुणाच्या जीवावर; झाड अंगावर पडून झाला मृत्यू

मिरज मेडीकल कॉलेजच्या क्रीडांगण येथे कंपाऊंड भिंतींवर मोबाईल वर बोलत असताना असताना अंगावर झाडाची फांदी पडल्याने यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी बाजूला काढून यशाच्या मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यश कदम हा कंपाऊंडच्या भींतीवर चढून बसला होता. त्याने कानात हेडफोन घातले […]

ताज्याघडामोडी

इंडियन बार असोसिएशनची संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका

न्यायव्यवस्थेवरील टीका आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भोवणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात इंडियन बार असोसिएशनने अवमान याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांच्यासह या याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. किरीट सोमय्या […]

ताज्याघडामोडी

गाड्या आणखी महागणार, सरकार रोड टॅक्स वाढवण्याच्या तयारीत

तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि कार घेण्याचा विचार करत असाल, तर हे काम लवकर पूर्ण करा.  कारण येत्या काही दिवसांत दिल्लीत कार खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक वाहने (कमर्शियल व्हेईकल), कार आणि एसयूव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण परिवहन विभागाने काही ठराविक श्रेणींच्या वाहनांवरील रोड टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. […]

ताज्याघडामोडी

जून महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून जाणार

राज्यातील सत्ताधारी मविआ आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. यात दोन्ही बाजूने रोजच आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. हे सरकार पडणार असल्याचे अनेकवेळा भाजप नेत्यांकडून विधाने करण्यात आली. आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. जून महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून जाणार असल्याचे […]

ताज्याघडामोडी

सिल्व्हर ओकवर हल्ला हा माझा आईवर होता, सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. ‘सिल्व्हर ओकवर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता’ असं मोठा खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे या आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सिल्व्हर ओकवरील हल्ल्या प्रकरणात पहिल्यांदाच आपली भूमिका […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पाऊस कोसळणार

उष्णतेचा पारा चढला असताना गेल्या आठवड्यात पावसाने अनेक भागात हजेरी लावली. येत्या 48 तासांत राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीय वाऱ्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात देखील वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात 19 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा […]

ताज्याघडामोडी

विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नियम लागू

विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील सर्व शाळांमध्ये पुस्तकांबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे कमी होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर आता पुस्तकांचा भार कमी होणार आहे. त्यामुळे दप्तराचा भार पेलवणारा होणार आहे. इयत्ता पहिलीसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये नियम लागू होणार आहेत. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बाईकचा हप्ता भरला नाही म्हणून शेतकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

बाईकचा हप्ता भरला नाही म्हणून वसुली एजंटने शेतकऱ्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूर येथे हि घटना घडली आहे. संदीप मांड (25) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भर वर्दळीच्या रस्त्यात घडली. गोळीबार करण्यापूर्वी या वसुली एजंटने संदीप यांची बाईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला पोलिसाची आत्महत्या; पतीच्या छळामुळे उचललं टोकाचं पाऊल

महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. योगिनी पवार असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या पोलिस मुख्यालयात कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील पोलिस लाईनमध्ये त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्या चिठ्ठीत त्यांनी पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे […]