दिल्लीत उष्णतेमुळे लोकांचे हाल होत असले तरी, मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे. उद्या रविवारी 11 जूनपासून राज्यात येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान […]
ताज्याघडामोडी
बँक मॅनेजरशी संगनमत करुन आईने मुलगा, मुलीला घातला साडेचौदा लाखांना गंडा
मुलगा आणि मुलीचे बँक खात्याचे चेक चोरुन त्यावर बनावट सह्या करुन आईनेच बँक मॅनेजरशी संगनमत करुन १४ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोकमान्यनगर येथे राहणार्या एका २१ वर्षाच्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८७/२२) दिली आहे. त्यानुसार फिर्यादीची आई व बँक मॅनेजर गौरव गिरीश लोणकर (वय […]
संभाजीराजे छत्रपती यांनी केले उपरोधिक ट्विट
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll “वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”. ४२ मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची फजिती झाली, हेच संभाजीराजेंना यातून सुचवायचे असल्याचे आता बोलले जात आहे. सहाव्या […]
धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची 27 मतं
अपक्षांची 9-10 मतं फुटल्याचा अंदाज राज्यसभा निवडणुकीवरुन महाराष्ट्रामध्ये मोठे नाट्य पाहण्यास मिळाले आहे. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिकच हे कोल्हापूरचे ‘पैलवान’ ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे. भाजपचे संख्याबळ 122 इतकी होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत […]
आषाढी यात्रेच्या पूर्वसंध्येला अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय, धडक कारवाई
धडक कारवाईमध्ये तब्बल 7 लाख 22 हजाराच्या प्रतिबंधित अन्न पदार्थासह 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक 10/06/2022 रोजी अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रशांत कुचेकर यांना कटफळ पिलीव या मार्गावरून मोटेवाडी, ता. माळशिरसकडे प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक केली जाणार असल्याबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी […]
221 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची 21 जूनला प्रसिद्धी
विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या 221 नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये 208 नगरपरिषदा आणि 13 नगरपंचायतींचा समावेश आहे. भारत निवडणूक […]
लग्नाच्या आमिषाने शिक्षकाने ठेवले विद्यार्थिनींशी संबंध.. दुसऱ्याशी लग्न ठरताच ‘प्रायव्हेट’ फोटो केले व्हायरल
कर्नाटक पोलिसांनी विद्यार्थिनीचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने तिचे खाजगी फोटो शेअर केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ४४ वर्षीय शिक्षकाची विद्यार्थिनीशी मैत्री होती. तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. आरोपी शिक्षकाने त्यांच्या खासगी क्षणांचे फोटोही काढले होते. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी […]
राज्यसभेसाठी काँग्रेसने ‘मविआ’चा ‘हात’ सोडला; केवळ प्रतापगढींसाठीच लावली फिल्डिंग
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विजयासाठी दोन्ही बाजूला अगदी एक – एक मत महत्वाचं बनलं आहे. सोबत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातात विजयाची चावी आहे. अशातच आता काँग्रेसच्या दोन मतांचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने त्यांचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ […]
गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. यादरम्यान भाजपाचे एक आमदार चक्क रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. […]
मतदाराला देशात कुठूनही करता येणार मतदान
निवडणूक आयोग प्रायोगिक तत्वावर ‘रिमोट व्होटिंग’ करता येणे शक्य आहे काय याची तपासणी करत असून त्या संदर्भात एक समिती स्थापन केली जात आहे. देशात अनेक मतदार त्यांच्या मतदारसंघातून मतदान करू शकत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षण, नोकरी निमित्ताने अनेक नागरिक देशात अन्य ठिकाणी राहतात तर फिरते कामगार, कंत्राटी मजूर, ऊस तोडणी कामगार असा मोठा […]











