गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाच्या आमिषाने शिक्षकाने ठेवले विद्यार्थिनींशी संबंध.. दुसऱ्याशी लग्न ठरताच ‘प्रायव्हेट’ फोटो केले व्हायरल

कर्नाटक पोलिसांनी विद्यार्थिनीचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने तिचे खाजगी फोटो शेअर केल्याप्रकरणी  एका शिक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यान्वये  गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ४४ वर्षीय शिक्षकाची विद्यार्थिनीशी मैत्री होती. तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. आरोपी शिक्षकाने त्यांच्या खासगी क्षणांचे फोटोही काढले होते.

दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत निश्चित केले. तिचे लग्न रोखण्यासाठी आरोपीने मुलीचे खासगी छायाचित्र व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून ते व्हायरल केले. ही बाब गावकऱ्यांना समजल्यानंतर शाळेतील आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना खेचून पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रारही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *