ताज्याघडामोडी

आषाढी यात्रेच्या पूर्वसंध्येला अन्न व औषध प्रशासन विभाग सक्रिय, धडक कारवाई

धडक कारवाईमध्ये तब्बल 7 लाख 22 हजाराच्या प्रतिबंधित अन्न पदार्थासह 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

दिनांक 10/06/2022 रोजी अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रशांत कुचेकर यांना कटफळ पिलीव या मार्गावरून मोटेवाडी, ता. माळशिरसकडे प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक केली जाणार असल्याबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व नमुना सहायक श्रीशैल हिटनल्ली यांनी सापळा रचला.

सकाळी 06.30 वा च्या सुमारास गोपनीय माहितीतील वर्णनाप्रमाणे वाहन महिंद्रा पिकअप MH ४५, T-१३२७ हे भरधाव वेगाने कटफल पिलीव रस्त्याने येत असताना दिसली असता त्यास पिलीव येथे थांबविण्याचा इशारा केला असता सदर चालकाने वाहन न थांबविता पथकाच्या वाहनास कट मारून निघून गेला. त्यानंतर सदर वाहनाचा पिलिव मोटेवाडी रोडवर पाठलाग करीत असताना झिंजेवाडी, पिलीव येथे सदर वाहनातील प्रतिबंधित अन्न पदार्थाचे साठा मालक बारीकराव मोटे यांनी बुलेट दुचाकी नं. ८०५५ घेवून पथकाच्या वाहनास जाणूनबुजून बुलेट दुचाकी वाहन आडवी लावून प्रतिबंधित अन्न पदार्थाने भरलेली वाहन पळवून लावण्यास मदत करून सरकारी कामात अडथळा आणला.

त्यानंतर पुन्हा संशयित वाहनाचा शोध घेतला असता अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकास संशयित वाहन महिंद्रा पिकअप MH ४५, T-१३२७ हे मोटेवाडी ग्रामपंचायत समोर लावल्याचे दिसून आले. सदर वाहनाची त्यांनी तपासणी केली असता सदर वाहन रिकामे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर वाहन वायदंडे वस्ती, फ्रटर्ली वायनरी रोड, मोटेवाडी, माळशिरस या दिशेने जाऊन आल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावरून वायदंडे वस्तीतील संशयित घराची तपासणी केली असता सदर ठिकाणी भिवा शंकर वायदंडे यांच्या राहत्या घरी एका खोलीमध्ये वरील पिकअप वाहनातील मुद्देमाल साठविल्याचे आढळून आले. सदर साठ्याची श्री कुचेकर यांनी तपासणी करून जागेवर साठा जप्तीचा पंचनामा तयार केला व प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा ताब्यात घेतला. त्यानंतर श्री कुचेकर व त्यांचे पथकाने माळशिरस पोलीस स्टेशन येथे जाऊन पुढील कारवाई पूर्ण केली.

सदर प्रकरणी साठा मालक बारीकराव मोटे, साठा आपले ताब्यात उतरवून घेत आरोपीस सहकार्य करणारे भिवा शंकर वायदंडे , भगवंत भिवा वायदंडे, महिंद्रा पिकअप MH ४५, T-१३२७ चे अद्यात वाहन चालक व पुरवठादार

यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियम शिक्षापात्र कलम ५९ व भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३२८, १८८, २७२, २७३ व ३४ नुसार माळशिरस पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर, श्रीमती प्रज्ञा सुरसे व नमुना सहायक श्रीशैल हिटनल्ली यांच्या पथकाने पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *