गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाव गुंडाची काढली धिंड; वाहनांची तोडफोड केल्यानं पोलिसांची कारवाई

पुणे, 15 जून: काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाकड परिसरात काही तरुणांनी बऱ्याच चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. रात्रीत झालेल्या या संताजपजनक प्रकारानंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तसेच या गुंडाच्या टोळक्याची परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. संबंधित गाव गुंडांनी दोन ते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित

कोणत्याही परवानगी शिवाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे यांनी तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड […]

ताज्याघडामोडी

कोरोनाविरोधात अमेरिकेची नोव्हाव्हॅक्स रणांगणात, 90 टक्के प्रभावी

अमेरिकेच्या नोव्हावॅक्स फार्मा कंपनीने अत्यंत प्रभावी नोव्हाव्हॅक्स लसीच्या उत्पादनाची घोषणा आज केली. ही लस गंभीर रुग्णांवरही 90 टक्के प्रभावी असून कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सवरला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हिंदुस्थानात या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिटय़ूट करणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी हिंदुस्थानात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनबरोबर आणखी एक लस उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या नोव्हावॅक्स या […]

ताज्याघडामोडी

कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यानंतर ४५७ जणांचा, तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी सध्या देशभरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सीएनएन न्यूज १८ ने सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणामुळे आतापर्यंत देशात ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला वैज्ञानिक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षिकेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पर्समध्ये सापडली सुसाईड नोट

अहमदनगर : नगर शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने इमामपूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वंदना रेपाळे असं या शिक्षिकेचं नाव असून त्या धनगवाडी येथील शाळेत नोकरीला होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर सुनील पांडुरंग टिमकरे हे आपल्या शेतात वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच घेतल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. मंजुषा विधाते असे त्यांचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे टीडीआर संदर्भात एक प्रकरण महापालिकेत अडकले […]

ताज्याघडामोडी

लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही

लेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही    (प्रतिनिधी): पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये यश संपादन केल्याबद्दल नूतन आमदार समाधान आवताडे यांचा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीने लेबर फेडरेशनमध्ये सभेसाठी आले असता  अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.     यावेळी सत्कारास उत्तर देताना आ. समाधान आवताडे म्हणाले की, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक, सख्ख्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार; कुटुंब हादरलं…!

नवी मुंबई, 14 जून : नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात […]

ताज्याघडामोडी

शिवस्वराज्य युवा संघटनेचा राज्यस्तरीय ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

शिवस्वराज्य युवा संघटनेचा राज्यस्तरीय ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न पंढरपूर (प्रतिनिधी):-  शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय  शिवस्वराज्य ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा दि.14 जुन 2021 रोजी विठ्ठल इन, पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी   अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्षह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन […]

ताज्याघडामोडी

दुर्दैवी ! शाळेवर रुजू होण्यासाठी जाणाऱ्या चार शिक्षकांची कार पडली खड्ड्यात, पाण्यामध्ये चौघांचाही गुदमरून मृत्यू

हिंगोली – दिशादर्शक फलक नसल्याने भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघात चार शिक्षकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. जिल्ह्यातील सेनगाव येलदरी या राष्ट्रीय महामार्गावरील भानखेडा या गावाजवळ हा अपघात झाला आहे. अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असून अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. लोणार तालुक्यातील पळसखेडा […]