ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेकडून लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल

पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, यापूर्वी नगरपरिषदेने लसीकरणच्या 4000 नोंदणी केली होती त्यामधील 3800 लोकांची यादी प्रसिद्ध करून लस देण्यात आली आहे उर्वरीत 200 जण यांना लवकरच यादी प्रसिद्ध करून लस देण्यात येईल सध्या लसीकरण केंद्रावर होत असले गर्दी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा लसीकरण केंद्रावर नोंदणी करूनच लस देण्याचा निर्णय […]

ताज्याघडामोडी

पुढच्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

 महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांपासून तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच किंबहुना अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून […]

ताज्याघडामोडी

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात होणार 25 टक्क्यांची कपात

देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे, पण ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विद्यार्थ्याना संकटाला […]

ताज्याघडामोडी

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना दिलासा दिला होता. पण, आता सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदुरीकर महाराज अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला […]

ताज्याघडामोडी

स्टेट बँकेने ‘या’ नियमात केला मोठा बदल, पालन न केल्यास खाते गोठवणार

ऑनलाइन बँकिंग अ‍ॅप YONO च्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टेट बँक ऑफ इंडियाने एक कठोर नियम लागू केला आहे. ग्राहकांना या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. मोबाइल बँकिंगचा वापर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात वाढला आहे व यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे एसबीआयने हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांचे खाते गोठवले […]

ताज्याघडामोडी

आषाढ पौर्णिमा निमीत्त पंढरीतील बुद्धभूमीवर “धम्मचक्क पवत्तन सुत्त” पठण

तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या ज्ञानप्राप्ती नंतर पंच वर्गीय भिक्खूंना जो प्रथम उपदेश सारनाथ येथे केला होता तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. या  दिनाचे  औचित्य साधून तथागतांचा हा धम्मोपदेश जो धम्मचक्क पवत्तन सूत्त म्हणून प्रसिद्ध आहे या सुताचे पठण आज पंढरी नगरीतील बुद्धभूमीवर संपन्न झाले.  बौद्ध परंपरेतून आलेल्या वर्षावास संकल्पनेचा अंगीकार करीत वारकरी संप्रदाय चातुर्मास […]

ताज्याघडामोडी

भीमा नदी काठांवरील गावांनी सतर्क रहावे  

भीमा-निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.  तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने  भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी  सतर्क राहावे,असे आवाहन  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने  तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनीक मालमत्तेचे […]

ताज्याघडामोडी

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? सलग पाचव्या दिवशी किंमती स्थिर

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढता आलेख असलेले इंधनाचे दर आता स्थिरावले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी 17 जुलै रोजी इंधनाच्या दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती. गेल्या काही दिवसांपासून दरात कोणतेही बदल झाले नसल्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माझ्या हॉटेलपेक्षा त्याच्या हॉटेलचा धंदा जास्त

पुण्यातील प्रसिद्ध गारवा हॉटेलच्या मालकाच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. गारवा हॉलेटच्या शेजारी अशोका हॉटेल होतं. या हॉटेलच्या मालकांनी सराईत गुन्हेगार भाच्याला सुपारी देऊन गारबा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात लोणी काळभोर पालिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये […]

ताज्याघडामोडी

स्वप्नील लोणकरच्या वडिलांचे २० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी भाजपाचा पुढाकार

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. […]