

तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या ज्ञानप्राप्ती नंतर पंच वर्गीय भिक्खूंना जो प्रथम उपदेश सारनाथ येथे केला होता तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. या दिनाचे औचित्य साधून तथागतांचा हा धम्मोपदेश जो धम्मचक्क पवत्तन सूत्त म्हणून प्रसिद्ध आहे या सुताचे पठण आज पंढरी नगरीतील बुद्धभूमीवर संपन्न झाले. बौद्ध परंपरेतून आलेल्या वर्षावास संकल्पनेचा अंगीकार करीत वारकरी संप्रदाय चातुर्मास परंपरेद्वारे पंचशील पालन करीत पुढे नेत आहे. बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरीत बुद्ध वचनांचा संदेश जनमानसांत पोहाचवावा या उद्देशाने सम्यक क्रांती मंच ने धम्मचक्क पवत्तन सुत्त पठण तथा श्रवण हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, माजी उपनगराध्यक्ष सुनील सर्वगोड, सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, सहसचिव स्वप्निल गायकवाड, खजिनदार रवींद्र शेवडे, बसपा जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, ज्ञानेश्वर वाघमारे, निलेश सोनवणे, प्रवीण माने, कृष्णा लिहिने, रामचंद्र सरवदे, धम्म मित्र प्रभाकर सरवदे इत्यादी उपस्थित होते